बँकॉकमधून खरेदी करा iPhone 15 Pro Max आणि फुकटात फिरून या, इतकं करूनही वाचतील 24 हजार रुपये

| Updated on: Sep 13, 2023 | 10:33 PM

आयफोन 15 सीरिज लाँच झाली आहे. त्यामुळे या फोनची किंमत पाहूनच अनेक जण पाठ फिरवत आहेत. तर भारतापेक्षा इतर देशांमध्ये स्वस्त फोन मिळत असल्याने तिकडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. जर तुम्ही थायलंडमधून आयफोन 15 प्रो मॅक्स खरेदी केला तर फायदा होऊ शकतो.

बँकॉकमधून खरेदी करा iPhone 15 Pro Max आणि फुकटात फिरून या, इतकं करूनही वाचतील 24 हजार रुपये
बँकॉकमधून iPhone 15 प्रो खरेदी करणं ठरेल फायदेशीर, संपूर्ण टूर होईल फुकट आणि 24 हजार रुपयांचा वेगळाच फायदा
Follow us on

मुंबई : आयफोन 15 सीरिजची मोठ्या दिमाखात लाँचिंग झाली आहे. आता मोबाईलप्रेमींमध्ये या फोनची जोरदार चर्चा झाली आहे. आयफोन 14 असलेले युजर्स आता आयफोन 15 घेण्याची तयारी करत आहेत. कंपनीने आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स लाँच केला आहे. भारतात आयफोन प्रो मॅक्सची किंमत 1,59,000 रुपयांपासून सुरु होत आहे. ही किंमत काही देशांच्या तुलनेत जास्तच आहे. इतकंच काय तर थायलंडसारख्या देशातून आयफोन प्रो मॅक्स खरेदी केला तर स्वस्तात मिळेल. त्याचबरोब जाण्यायेण्याचा खर्च सुटेल आणि वरून पैशांची बचत होईल. हे कसं शक्य आहे याचं गणित समजून घ्या

आयफोन 15 प्रो मॅक्स थायलंडमधून खरेदी केला तर…

थायलंडमध्ये आयफोन प्रो मॅक्सची सुरुवातीची किंमत 48,900 थाय भाट आहे. भारतीय रुपयात सांगायचं तर 1,13,441 रुपये इतकी येते. म्हणजेच भारताच्या तुलनेत हा फोन थायलंडमध्ये 46,459 रुपयांनी स्वस्त आहे. आता इतके पैसे वाचून थायलंड टूर फ्री कशी होईल समजून घ्या. बँकॉक फ्लाईटचं राऊंड तिकीट 22 हजार रुपये आहे. आयफोन प्रो मॅक्स तिथून खरेदी केला तर 46,459 रुपये वाचतील. त्यातून फ्लाईटचे 22 हजार वजा केले तर 24,459 रुपये वाचतील.

आयफोन दुबईतून खरेदी करणं देखील फायद्याचं

दुबईत आयफोन प्रो मॅक्सची सुरुवातीची किंमत 5099 दिरहम आहे. भारतीय चलनात विचार केला तर याची किंमत 115143 रुपये इतकी होते. भारताच्या तुलनेत हा फोन तिथे 44,757 रुपयांनी स्वस्त आहे. आता दुबईच्या फ्लाईटचं तिकीट 20 हजार रुपये आहे. आता तिथे जाऊन येऊन हा खर्च वजा केला तर हातात 24,757 रुपये उरतात. त्यामुळे हा देखील फायद्याचा सौदा ठरू शकतो. म्हणजे आयफोन 15 प्रो मॅक्स खरेदी करताना बुर्ज खलिफादेखील बघता येईल.

असं करण्यापूर्वी या गोष्टींकडेही लक्ष द्या

आयफोन प्रो मॅक्स दुबई किंवा बँकॉकमधून खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण कंपनी त्या त्या देशाचे कायदे लक्षात घेऊन फीचर्स मोबाईलमध्ये देते. दुबईचा विचार केला तर यात फेस आयडी काम करत नाही. त्यामुळे हा फोन भारतात आणला तर फेस आयडी काम करणार नाही. त्याचबरोबर इंटरनॅशनल वॉरंटीचा प्रश्न देखील उद्भवेल.