मुंबई : Flipkart वरील स्मार्टफोन्सवर सध्या बंपर डिस्काऊंट दिला जात आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफर आहे. फ्लिपकार्टने Realme Narzo 30 Pro 5G हा स्मार्टफोन अवघ्या 849 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी दिली आहे. सोबत या फोनवर कंपनीने विविध ऑफर्स देऊ केल्या आहेत. (Buy Realme Narzo 30 Pro 5G smartphone in just Rs 849 by Flipkart Exchange offer)
रियलमी नार्झो 30 प्रो 5 जी (realme Narzo 30 Pro 5G) स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 16,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. याशिवाय या स्मार्टफोनवर कंपनीकडून 16,150 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात हा फोन विकत घेत असाल तर तुम्हाला केवळ 849 रुपये मोजावे लागू शकतील.
याशिवाय तुम्ही या फोनवर स्मार्ट अपग्रेड प्लॅनची ऑफरदेखील घेऊ शकता. तसेच तुमच्याकडे फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड असल्यास आणि त्याद्वारे तुम्ही हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळू शकतो. या व्यतिरिक्त या फोनची मूळ किंमत 18999 रुपये इतकी आहे. परंतु हा फोन सध्या कंपनीकडून 16,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. सोबतच तुम्ही Disney + Hotstar VIP चं सब्सक्रिप्शनदेखील मिळवू शकता.
फ्लिपकार्टवरुन हा फोन तुम्ही 6 GB आणि 8 GB रॅम अशा दोन वेरिएंटमध्ये खरेदी करु शकता. तसेच यामध्ये ब्लेड सिल्व्हर आणि स्वॉर्ड ब्लॅक कलर ऑप्शन्स आहे. तुम्ही जर 8 जीबी रॅम असलेलं व्हेरिएंट खरेदी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला 19,999 रुपये द्यावे लागतील. या फोनवर तुम्हाला 17,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळू शकते. या व्यतिरिक्त तुम्ही या दोन्ही स्मार्टफोनवर नो-कॉस्ट ईएमआयचा लाभ घेऊ शकता.
Realme Narzo 30 प्रो 5 जी कनेक्टिव्हिटी आणि 120 हर्ट्ज स्क्रीनसह सुसज्ज आहे. 5 जी साठी Narzo 30 प्रो मध्ये ऑक्टा कोअर मीडियाटेक डायमेन्शन 800 यू प्रोसेसर देण्यात आला आहे जो रियलमी एक्स 7 5जी मध्ये आहे. प्रोसेसरमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस आहे. हा स्मार्टफोन मायक्रो एसडी कार्ड सपोर्टसह सुसज्ज आहे. रियलमी Narzo 30 प्रो मध्ये 6.5 इंचाची एलसीडी स्क्रीन आहे जी 1080p रेजोल्यूशनसह येते. फोनमध्ये 405 पीपीआय पिक्सेल डेन्सिटी आणि 600 पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे.
या फोनच्या कॅमेर्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे, तर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. या फोनच्या कॅमेरामध्ये आपणास 48 मेगापिक्सल मोड, सुपर नाईटस्केप मोड, नाईट फिल्टर्स, क्रोमा बूस्ट, पॅनारॉमिक व्यू, एक्सपर्ट, टाइमलॅप्स, एचडीआर, अल्ट्रा वाइड, अल्ट्रा मॅक्रो आणि अन्य वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
फोनची बॅटरी 5000mAh क्षमतेची आहे जी 30 डार्ट फास्ट चार्जिंगसह येते. फोनमध्ये साइड माउंट केलेला फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हा फोन डॉल्बी एट्मॉस, Hi- Res ऑडिओ तंत्रज्ञानासह सादर करण्यात आला आहे.
इतर बातम्या
18GB रॅम, 24MP सेल्फी कॅमेरा, ‘या’ जबरदस्त स्मार्टफोनची 15 एप्रिलपासून विक्री
Samsung Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्सवर 12000 रुपयांची सूट
4GB/64GB, 13MP कॅमेरा, किंमत 10 हजारांहून कमी, Infinix चा दमदार फोन लाँचिंगसाठी सज्ज
(Buy Realme Narzo 30 Pro 5G smartphone in just Rs 849 by Flipkart Exchange offer)