Amazon Holi Sale : होळीच्या मुहूर्तावर खरेदी करा हे स्मार्टफोन, कंपनीकडून भरघोस सूट

| Updated on: Mar 24, 2021 | 10:18 PM

होळीच्या या सेलमध्ये Mi 10i 5G, iPhone 12, Redmi Note 9 Pro Max यासारख्या स्मार्टफोनचा समावेश आहे. (Buy this smartphone on the occasion of Holi, a huge discount from the company)

Amazon Holi Sale : होळीच्या मुहूर्तावर खरेदी करा हे स्मार्टफोन, कंपनीकडून भरघोस सूट
होळीच्या मुहूर्तावर खरेदी करा हे स्मार्टफोन
Follow us on

नवी दिल्ली : अमेझॉनतर्फे होळीच्या निमित्ताने खास सेलचे आयोजन करण्यात आले आहे. यात काही उत्कृष्ट स्मार्टफोन खरेदीवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. या विक्रीसाठी भारतातील सर्वाधिक मागणी असणारा स्मार्टफोन अमेझॉनने सूचीबद्ध केला आहे. जर आपणही होळी निमित्त नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही डील खूप फायदेशीर ठरू शकेल. होळीच्या या सेलमध्ये Mi 10i 5G, iPhone 12, Redmi Note 9 Pro Max यासारख्या स्मार्टफोनचा समावेश आहे. (Buy this smartphone on the occasion of Holi, a huge discount from the company)

Mi 10i 5G स्मार्टफोनचा Atlantic Blue कलर सेलसाठी लिस्टेड करण्यात आला आहे. Mi 10i 5G फोन 108MP क्वाड रिअर कॅमरा सेटअपसह येतो. यात Qualcomm Snapdragon 750G ऑक्टाकोर प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

iPhone 12 स्मार्टफोन ब्लू कलर ऑप्शन अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. iPhone 12 एडवांस्ड ड्युल कॅमरा सिस्टमसह येईल. या प्रायमरी कॅमरा 12MP अल्ट्रावाईड अँगल आणि वाईड कॅमरा असेल. iPhone 12 ची किंमत 84,889 आहे.

Redmi Note 9 Pro Max चा Champagne Gold कलर ऑप्शन विक्रीसाठी लिस्टेड करण्यात आला आहे. Redmi Note 9 Pro Max स्मार्टपोन 64MP क्वाड कॅमरा सेटअपसह येईल. यात अल्ट्रावाईड, मॅक्रो मोड, सुपर मॅक्रो, पोर्ट्रेट, नाईट मोड देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन Qualcomm Snapdragon 720G ऑक्टाकोर प्रोसेसरसह येईल. हा फोन MIUI 11 सिस्टमवर काम करेल. फोनची किंमत 14,999 रुपये आहे.

OnePlus 8T 5G स्मार्टफोन Lunar Silver ऑप्शनमध्ये येईल. OnePlus 8T 5G स्मार्टफोन 48MP Pro ग्रेड क्वाड कॅमरा सेटअपसह येईल. फोनमध्ये 6.55 inch 120 Hz फ्ल्यूड एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन का रेझोल्युशन 2400 X 1080 पिक्सल आहे. याची किंमत 45,999 रुपये आहे.

Apple iPhone 12 Mini चा ग्रीन कलर ऑप्शन 67,100 रुपयांमध्ये येईल. फोनमध्ये 5.4 इंच सुपर रेटीना XDR डिस्प्ले आहे. फोन सिरॅमिक शिल्डसह येईल. याची किंमत 67,100 रुपये आहे.

Redmi 9 Power हा स्मार्टफोन Fiery Red कलर ऑप्शनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हा फोन 48MP क्वाड रियर कॅमरा सेटअपसह येईल. यात अल्ट्रा वाईड, मॅक्रो मोड, पोर्ट्रेट मोड देण्यात आला आहे. फोन 6000 mAh पावरफुल बॅटरी बॅकअप आणि 18W चार्जिंग सपोर्टसह येईल. फोनची किंमत 10,499 रुपये आहे. (Buy this smartphone on the occasion of Holi, a huge discount from the company)

इतर बातम्या

आलियाच्या नव्या चित्रपटाच्या अडचणीत वाढ, गंगुबाई काठियावाडी यांच्या मुलाकडूनच कोर्टात याचिका, कारण…

पुरुषांमध्ये सर्वात आधी ‘ही’ गोष्ट पाहतात महिला, नंतरच घेतात निर्णय