नेटवर्क, इंटरनेटशिवाय कॉल करणे शक्य, फक्त ‘हे’ काम करा

| Updated on: Dec 18, 2024 | 3:02 PM

आता सिम नेटवर्क किंवा डेटाशिवाय कॉल करता येणार आहे. यासाठी तुम्हाला नेटवर्क, वायफाय किंवा डेटा प्लॅनची गरज भासणार नाही. यासाठी तुम्हाला फक्त आपल्या स्मार्टफोनमधील हे फीचर ऑन करावे लागेल. यानंतर तुमची सर्व कामे पूर्ण होतील.

नेटवर्क, इंटरनेटशिवाय कॉल करणे शक्य, फक्त हे काम करा
Follow us on

अनेकदा आपण बाहेर गेल्यावर आपल्या फोनमध्ये सिमकार्डला नीट नेटवर्क नसतं त्यामुळे डेटाही नीट फोनमध्ये चालत नाही. त्यातच तुम्हाला एखादा महत्वाचा फोन कॉल करायचा असला तर आपण नेटवर्क शोधत इकडे तिकडे फिरत राहतो. असावेळी नेमकी समजत नाही की काय करावे समोरच्या व्यक्तीला कॉल कसा करावा? पण तुम्हाला आता एवढी काळजी आणि चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्ही सिमकार्डच्या नेटवर्कशिवाय आणि डेटाशिवाय देखील कॉल करू शकाल. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या स्मार्टफोनमधील हे फीचर ऑन करावे लागणार आहे. आता हे फिचर कोणते? याचा विचार करत असाल तर याविषयीची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखात देत आहोत. यानंतर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्येही हे फीचर ऑन करू शकाल. कॉल देखील करू शकाल.

सिम नेटवर्क आणि डेटाशिवाय कॉल कसा करणार ?

तुम्हालाही सिम नेटवर्क आणि डेटाशिवाय कॉल करायचा असेल तर ही ट्रिक ट्राय करा. जर तुमच्याकडे ओप्पो किंवा वनप्लस स्मार्टफोन असेल तर तुम्ही हे काम अगदी आरामात करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त तुमचा फोन अनलॉक करावा लागेल. अनलॉक केल्यानंतर तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. सेटिंगमध्ये गेल्यानंतर मोबाइल नेटवर्कवर क्लिक करा. येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, यामध्ये तुम्हाला BeaconLink वर क्लिक करावं लागेल. हे फीचर इनेबल करा. आता तुम्ही 200 किंवा 300 मीटर अंतरावर सर्व ओप्पो किंवा वनप्लस फोनवर कॉल करू शकता.

हे सुद्धा वाचा

फोन चालू असूनही समोरच्या व्यक्तीला स्विच ऑफ आहे असे सांगितले जाईल

यासाठी फक्त या स्टेप्स फॉलो करा, फोनमधील कॉल सेक्शनमध्ये जा, त्यानंतर सप्लिमेंटरी सर्व्हिसवर क्लिक करा. वेगवेगळ्या फोनमध्ये वेगवेगळ्या नावाने हे फीचर असू शकते.

कॉल वेटिंग ऑप्शन दाखवला जाईल, काही स्मार्टफोन्समध्ये कॉल वेटिंग आधीच इनेबल आहे. हा पर्याय डिसेबल करा. त्यानंतर कॉल फॉरवर्डिंगला जा.

कॉल फॉरवर्डिंगच्या पर्यायावर क्लिक केल्यास दोन पर्याय दिसतील. व्हॉईस कॉलच्या पर्यायावर क्लिक करा. फॉरवर्ड वेन बिजी या पर्यायावर क्लिक करा.

ज्या नंबरवर तुम्हाला कॉल फॉरवर्ड करायचा आहे तो नंबर टाका, त्यात तुम्ही तोच नंबर टाकता जो स्विच ऑफ आहे. आता खालील इनेबल पर्यायावर क्लिक करा. यानंतर जेव्हा कोणी फोन करेल तेव्हा फोन स्विच ऑफ सांगेल.