नवी दिल्ली | 15 February 2024 : अनेकदा आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की, तंत्रज्ञान कंपन्यांचे मालक, या कंपन्यांचे सीईओ दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा वापर करत असतील की नाही? तर एका मुलाखतीत याविषयीचे विश्वास न बसणारे उत्तर समोर आले. गुगलचे आणि अल्फाबेट कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मुलाखती दरम्यान हे उत्तर दिले. एकदी व्यक्ती साधारणपणे किती स्मार्टफोन हाताळत असेल. तुम्ही म्हणाल डोक्यावरुन पाणी, पाच ते आठ मोबाईल एखादी व्यक्ती हाताळू शकते. अनेक जण एकदा मोबाईलमध्ये डोके खुपसल्यावर बाहेर काढत नाहीत. मग गुगलचे सीईओ विविध कामांसाठी किती स्मार्टफोनचा वापर करत असतील?
एका वेळी 20 स्मार्टफोनचा वापर
अनेक जणांना त्यांचा स्मार्टफोन कुठे ठेवला, हेच आठवत नाही. ते रिंग करायला सांगतात. पण टेक्नोसॅव्ही सुंदर पिचाई विविध कामासाठी 20 हून अधिक स्मार्टफोनचा वापर करतात. कारण त्यांना वेगवेगळ्या कामासाठी डिव्हाईस टेस्ट करावे लागतात. गुगलची उत्पादनं विविध स्मार्टफोनवर योग्यरितीने काम करतात की नाही, हे ते तपासतात.
तंत्रज्ञानाचा योग्य वापर व्हावा
सुंदर पिचाई एक दोन डझन फोन वापरण्यासाठीच ओळखले जात नाहीत. तर तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करण्यात ही त्यांचा खासा हातखंड आहे. मुलांनी किती वेळ स्क्रीन शेअर करावी, याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. मुलांवर नियमांची सक्ती करणे त्यांना मान्य नाही. पम स्वतःवर योग्य नियंत्रण ठेवण्यावर त्यांनी विश्वास दाखवला. तंत्रज्ञानाचा योग्य आणि खुबीने वापरावर त्यांनी भर दिला.
नाही बदलत वारंवार पासवर्ड
गुगल अथवा इतर खात्याच्या सुरक्षिततेविषयी विचारणा केली असता, वारंवार पासवर्ड बदलत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याऐवजी सुरक्षित टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा उपयोग करत असल्याचे त्यांनी सांगितले. सुंदर पिचाई यांचा कृत्रिम बुद्धीमतेवर (AI) विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. मानवासाठी एआय हे महत्वपूर्ण तंत्रज्ञान असल्याचे त्यांनी सांगितले. त्याची तुलना वीजेच्या आणि इतर अत्यंत महत्वपूर्ण संशोधनासाठी ते करतात. पण एकदाच इतके स्मार्टफोन वापरणे सोपे काम नाही, हे तुम्हाला ही माहिती आहे, नाही का?