नवी दिल्ली | 30 नोव्हेंबर 2023 : आधुनिक जीवनशैलीत मोबाईलशिवाय आपण एक क्षण पण राहू शकत नाही. त्यामुळे मोबाईल फोनचा वापर करणाऱ्यांसाठी सिम कार्ड नियमांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. सिम कार्डविषयीचा हा नियम 1 डिसेंबर 2023 रोजीपासून म्हणजे शुक्रवारपासून लागू होत आहे. जर तुम्ही नवीन सिमकार्ड घेण्याच्या विचारात असाल तर हा नियम तुमच्यासाठी महत्वाचा आहे. नवीन नियमांच्या अंमलबजावणीनंतर एका ओळखपत्रावर सिम खरेदीला बंधन येतील. अतिरिक्त सिम खरेदीवर कडक कारवाई प्रस्तावित आहे.
यासाठी नियमात बदल
बोगस सिमकार्डचे सध्या पेव फुटले आहे. तसेच त्याआधारे फसवणुकीचे प्रकार पण वाढले आहेत. वाढत्या फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने सिम कार्ड खरेदी आणि विक्रीसाठी नवीन नियम लागू करण्यात येतील. हे नवीन नियम 1 डिसेंबरपासून संपूर्ण देशात लागू होतील. त्यामुळे बोगस सिमकार्ड आधारे करण्यात येणाऱ्या घोटाळ्यांना पायबंद घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंड आणि तुरुंगाची तरतूद आहे.
असा होईल बदल