नवी दिल्ली : भारत-चीन सीमारेषा भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यासारख्या अनेक अॅप्लिकेशनचा यात समावेश आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड असलेल्या त्या अॅप्सचं पुढे काय होणार? हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं आहे. (Chinese Apps TikTok Ban Here is What Will Happen To Your App Now)
सरकारी अधिकारी सर्व भारतीय इंटरनेट सेवा प्रदाता (आयएसपी) आणि दूरसंचार सेवा प्रदात्यांना (टीएसपी) आधीपासूनच याविषयी माहिती देत आहेत. ते या अॅप्समधून येणारा आणि अपलोड होणारा सर्व डेटा, तसेच इंटरनेट ट्राफिक रोखत आहेत.
यापैकी बहुतांश अॅप्स केवळ ऑनलाइन चालतात (उदाहरणार्थ, ‘टिक टॉक’ सारखे सोशल मीडिया अॅप, ‘यूसी ब्राऊझर’ हे कंटेंट आणि ब्राऊझिंग अॅप, तर ‘क्लॅश ऑफ किंग्ज’ हा ऑनलाइन गेम) याचा अर्थ असा, की बंदी घातलेली सर्व अॅप्स इंटरनेट रोखल्याने आपोआप अकार्यक्षम (नॉन फंक्शनल) होतील.
टिक टॉक, शेअर इट, हॅलो यांच्यावर भारतात अॅप स्टोअरमध्ये बंदी घातल्याचा अर्थ या अॅप्सपैकी कोणालाही भारतात डेव्हलपर सपोर्ट मिळणार नाही. परिणामी, कोणीही आता ते नव्याने डाऊनलोड करू शकणार नाही, तर आधीपासून हे अॅप ज्यांनी डाऊनलोड केलेले आहेत, ते वापरकर्ते अॅपमध्ये प्रवेश करु शकणार नाहीत. हे आज विशेषतः जास्त धोकादायक आहे, कारण बहुतेक सायबर हल्ले अशा अॅपच्या माध्यमातून यूझरना लक्ष्य करतात.
भारतीय सार्वभौमत्व, संरक्षण, एकात्मतेबद्दल पूर्वग्रह दूषित असल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने याबाबतचे कठोर पाऊल उचलले आहे. डेटा आणि गोपनीयता समस्यांमुळे भारत सरकारने हे पाऊल उचललं असल्याचे बोललं जात आहे.
भारताकडून चीनच्या ‘या’ अॅपवर बंदी
अॅपचा अब्जावधी डॉलर्सचा बाजार आणि भारत
⦁ भारत जगातील वेगानं वाढणारा मोबाईल बाजार
⦁ भारतात सध्या अॅपचे 161 दशलक्ष वापरकर्ते
⦁ 2019 या एकाच वर्षात भारतीयांनी 19 अब्ज अॅप डाऊनलोड केले.
⦁ भारतीय अॅप बाजाराचा विस्तार 190% अशा प्रचंड वेगानं होतोय, तर चीनचा 80% वेगानं
⦁ भारतीयांनी अॅपच्या माध्यमातून केलेला खर्च 120 दशलक्ष डॉलर्सचा
⦁ 2020 मध्ये अॅप उत्पादकांना 267 दशलक्ष डॉलर्स उत्पन्नाची शक्यता
⦁ 2024 पर्यंत हेच उत्पन्न 369 दशलक्ष डॉलर्सवर पोहचण्याचा अंदाज
अॅप बंदीचा चीनला कसा फटका?
⦁ चीनच्या 59 अॅपवर बंदी आल्यानं त्यांच्यापासून सर्वाधिक वेगानं वाढणारा बाजार दुरावणार
⦁ चीनपेक्षाही दुप्पट वेगानं वाढणारा ग्राहकवर्गापासून चीनी कंपन्या वंचित राहणार
⦁ चीनी कंपन्यांच्या उत्पन्नावर स्वाभाविकच दुष्परिणाम होणार
Government of India bans 59 mobile apps. Tik Tok, UC Browser and other Chinese apps included in the list. pic.twitter.com/RZyZ9FsAsc
— ANI (@ANI) June 29, 2020