गाव सोडा, आता जंगलातही मिळणार फुल्ल नेटवर्क; या मोबाईल कंपनीचा मेगा प्लॅन काय?

| Updated on: Oct 29, 2023 | 2:40 PM

Satellite Network | तुम्ही कॉल ड्रॉप, रेंज न मिळणे अशा अडचणींचा सामना करत असाल तर आता लवकरच या समस्या छुमंतर होतील. कारण ही कंपनी मेगा प्लॅनसह बाजारात उतरत आहे. एलॉन मस्क यांची स्टारलिंक, जिओ स्पेस फायबर नंतर भारतात ही कंपनी पण धमाका करणार आहे. दर्जेदार सेवेसाठी ही कंपनी लवकरच सॅटेलाईट सोडणार आहे.

गाव सोडा, आता जंगलातही मिळणार फुल्ल नेटवर्क; या मोबाईल कंपनीचा मेगा प्लॅन काय?
Follow us on

नवी दिल्ली | 29 ऑक्टोबर 2023 : अनेकदा ग्रामीण अथवा शहरात ही काही भागात रेंजची मोठी समस्या असते. अशा भागात कॉल डिसकनेक्ट होण्याचे प्रमाण अधिक असते. प्रवासात असताना कॉल ड्रॉपचे प्रमाण अधिक जाणवते. काही ठिकाणी कितीवेळा समोरच्याचा क्रमांक डायल केला तरी नेटवर्क पोहचतच नाही. पण आता या समस्या लवकरच दूर होतील. देशात 5G चे वारे वाहत असले तरी अनेक भागात अजूनही 4G अथवा त्यापेक्षा कमी वेगाने इंटरनेट मिळते. देशात सॅटेलाईट इंटरनेटची योजना जोर धरु लागली आहे. एलॉन मस्क यांची स्टारलिंक, जिओ स्पेस फायबर या कंपन्यांनी या सेवेची घोषणा केली आहे. आता ही कंपनी पण धमाका करणार आहे.

Airtel उतरली मैदानात

एअरटेल पण या स्पर्धेत उतरली आहे. त्यामुळे ग्राहकांना गावातच नाही तर अति दुर्गम, जंगलात सुद्धा चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. एअरटेलने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसोबत (ISRO) करार केला आहे. एअरटेल कंपनी स्वतःचे दोन सॅटेलाईट बाजारात सोडणार आहे. त्यामुळे ग्राहकांना जगातील कोणत्याही भागातून कॉलिंग आणि नेटची सुविधा मिळेल.

हे सुद्धा वाचा

एअरटेलची OneWeb सेवा

एअरटेलचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांनी दिल्लीतील इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, देशात सॅटेलाईट कम्युनिकेशनचे तंत्रज्ञान आजघडीला उपलब्ध आहे. त्यामुळे अति दुर्गम भागात सेवा पुरविता येईल. सॅटेलाईट कम्युनिकेशनची सेवा ‘OneWeb’ हा अनेक सॅटेलाईटचा समूह आहे. त्यात भारती एअरटेलचा मोठा वाटा आहे.

गुजरातमध्ये स्टेशन

भारत कनेक्टिव्हिटीच्या नव्या जगात प्रवेश करेल, असे सुनील भारती मित्तल यांनी स्पष्ट केले. या सेवेमुळे देशातील ग्राहकाला जंगलात ही कॉलिंग आणि इंटरनेटच्या सुविधा मिळतील. हे सॅटेलाईट ग्राऊंड स्टेशनसी जोडल्या गेले आहेत. हे स्टेशन गुजरातमधील मेहसाणा येथे तयार करण्यात आले आहे. त्यामुळे स्पष्ट आवाज ऐकू येईल आणि वेगवान इंटरनेटची सुविधा मिळेल.

इस्त्रोच्या मदतीने 72 सॅटेलाईट

एअरटेलने इस्त्रोच्या मदतीने अंतराळात 72 सॅटेलाईट सोडण्यात आले. त्यासाठी इस्त्रोने GSLV MK3 ही दोन रॉकेट अंतराळात सोडली. त्याच्या सहायाने 72 सॅटेलाईट सोडण्यात आले. सॅटेलाईट कम्युनिकेशनच्या सहायाने दूरपर्यंत आता ऑनलाईन शैक्षणिक क्रांती टप्प्यात आली आहे. तर आपत्ती व्यवस्थापनातील संवाद न होण्याचा अडथळा दूर होणार आहे.