दिग्गज टेक कंपनी ॲप्पलच्या नवीन दमदार iPhone 16 या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. भारतातील ग्राहकांना गेल्या अनेक दिवसांपासून या दमदार स्मार्टफोनची प्रतिक्षा होती. कंपनीने 9 सप्टेंबर रोजी या वर्षातील सर्वात मोठ्या कार्यक्रमात इट्स ग्लोटाईम या टॅगलाईन खाली AI फीचर्ससह आयफोन 16 सीरीज लाँच केली होती. मुंबईतील बीकेसी कॉम्लेक्समधील स्टोरमध्ये या फोनच्या विक्रीपूर्वीच खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. ॲप्पल स्टोर उघडण्यापूर्वीच सकाळी सकाळीच ग्राहकांनी एकच गर्दी केलेली दिसली. यापूर्वी iPhone 15 च्या वेळेस गर्दी उसळली होती. यावेळी मात्र गर्दीचा उच्चांक मोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
VIDEO | Huge crowd gathers outside an Apple store in Mumbai as the new iPhone 16 series goes on sale from today.
हे सुद्धा वाचा(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/rA61tyivaY
— Press Trust of India (@PTI_News) September 20, 2024
21 तासांपासून लांब रांगेत
या नवीन आयफोन सीरीजची एकच क्रेझ दिसून आली. उज्ज्वल शाह हा ग्राहक गेल्या 21 तासांपासून रांगेत उभा आहे. तो काल सकाळी 11 वाजता आलेले आहे. आज सकाळी 8 वाजता स्टोरमध्ये जाणारा तो पहिला व्यक्ती होता. आपण उत्साहित असून या क्षणाची आतुरतेने प्रतिक्षा करत असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली. गेल्यावेळी आयफोन 15 खरेदीसाठी तो 17 तास रांगेत होता. यावेळी गर्दी अधिक असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
भारतीय ग्राहकांना दिला सुखद धक्का
गेल्यावेळी ॲप्पल कंपनीने देशात मुंबई आणि दिल्लीत दोन स्टोर उघडले होते. आयफोन भारतात तयार होत असल्याने त्याची किंमत कमी असेल असा गेल्यावेळी ग्राहकांचा अंदाज होता. पण त्यांच्या उत्साहवर कंपनीने पाणी फेरले होते. पण यंदा ॲप्पलने भारतीय ग्राहकांना मोठा दिलासा दिला. कंपनीने पहिल्यांदाच जुन्या सीरिजपेक्षा आयफोन स्वस्तात बाजारात उतरवला आहे. कंपनीच्या इतिहासात ही पहिलीच घटना ठरली आहे. गेल्यावर्षी कंपनीने आयफोन बाजारात उतरवला होता. यावेळी किंमत अधिक असेल असे गणित मांडण्यात येत होते. पण कंपनीने किंमत तर वाढवलीच नाही. पण सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
काय आहे किंमत
iPhone 16 आणि iPhone 16 Plus हे दोन मॉडल बाजारात उतरवण्यात आले आहे. ते Ultramarine, Teal, Pink, White आणि Black या रंगात मिळतील. या सीरीजमध्ये 128GB, 256GB, आणि 512GB स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे. iPhone 16 ची सुरूवातीची किंमत 79,900 आणि iPhone 16 Plus ची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये आहे.
तर iPhone 16 Pro (128GB) ची सुरुवातीची किंत 1,19,900 रुपये आहे. तर iPhone 16 Pro Max (256GB) ची सुरुवातीची किंमत 1,44,900 रुपये इतकी आहे. आयफोन 16 मध्ये 6.1 इंच आणि आयफोन 16 Plus मध्ये 6.7 इंचचा डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन ब्राईटनेस 200 Nits आहेत. कॅमेरा कॅप्चर बटन देण्यात आले आहे. यामध्ये A18 चिपसेट देण्यात आला आहे.