अँड्रॉयड युजर्ससाठी Google Maps मध्ये Dark Theme, कसं चालणार फीचर, फायदा काय, जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Mar 22, 2021 | 8:46 AM

इंटरनेट वापरणारा भारत जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे आणि म्हणूनच येथे वापरकर्त्यांच्या (युजर्स) गरजा पूर्ण केल्या जातात.

अँड्रॉयड युजर्ससाठी Google Maps मध्ये Dark Theme, कसं चालणार फीचर, फायदा काय, जाणून घ्या सर्वकाही
Follow us on

मुंबई : इंटरनेट वापरणारा भारत जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे आणि म्हणूनच येथे वापरकर्त्यांच्या (युजर्स) गरजा पूर्ण केल्या जातात. रस्ता शोधण्यासाठी, कुठेही फिरायला गेल्यानंतर वेगवेगळी ठिकाणं एक्स्प्लोर करण्यासाठी, बस स्टॉप, रेल्वे-मेट्रो स्थानकं, दुकानं, हॉटेल्स, एटीएम शोधण्यासाठी आपण गुगल मॅप्सचा (Google Maps) वापर करतो. गुगल मॅप्स हे अ‍ॅप जगभरातील वाहनचालकांना रस्ता दाखवण्याचं काम करतं. त्यामुळे तुम्ही गुगल मॅपचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. (Google Maps gets Dark Mode on its android app for all user in world)

गुगल मॅप्सने जगातील सर्व अँड्रॉईड युजर्ससाठी डार्क थीम रोलआउट करणे सुरू केले आहे. गेल्या वर्षभरापासून कंपनी या फीचरची चाचणी करीत आहे. गुगलने आपल्या अँड्रॉयड हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, “आपल्याला काय हवं आहे? डार्क थीम! आपल्याला ही थीम कुठे हवी आहे.? Google मॅप्स !” गेल्या वर्षी सप्टेंबरपासून गूगल कंपनी गुगल मॅपसाठी डार्क मोडची (डार्क थीम) चाचणी घेत आहे आणि आता ते फीचर अँड्रॉइड युजर्ससाठी जागतिक पातळीवर रोलआऊट करण्यात आलं आहे.

नाईट मोड किंवा डार्क मोडचा वापर आपल्या डोळ्यांना आवश्यक असलेला ब्रेक किंवा आराम देणे तसेच बॅटरी लाईफ वाचवण्यासाठी केला जाईल. दरम्यान, तुमच्या अॅपमध्ये डार्क थीम अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी, आपल्याला फक्त Google मॅप्समधील वरच्या उजव्या कोपर्‍यात मॅप आयकॉनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर कॉन्फिगरेशन पर्यायांच्या सूचीतील थीम सेटिंग्ज शोधणे आणि नंतर डार्क मोड सक्रिय करणाऱ्या पर्यायाची निवड करावी लागेल.

फीचरचा अ‍ॅक्सेस कसा मिळणार

या फीचरचा अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी युजर्सना अँड्रॉयड ओएसचं लेटेस्ट व्हर्जन 10.61.2 डाउनलोड करावं लागेल. डार्क मोड फीचर्ससह गुगल मॅप्समध्ये बॅकग्राउंडसाठी ग्रे कलरमध्ये सुपर-डार्क शेड देण्यात आली आहे. रस्त्यांची नवं ग्रे कलरच्या हलक्या शेडमध्ये दिसतील. ज्यामुळे युजर्स महत्त्वपूर्ण ठिकाण आणि रस्ते नीट पाहू शकतील.

आता कुटुंबीयांचं लोकेशन ट्रॅक करा

जेव्हा आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्याचा विचार केला जातो, तेव्हा गुगल मॅप याठिकाणी सर्वात प्रभावी अॅप असल्याचं सिद्ध होतं. आपण आपल्या मुलांबद्दल किंवा आपल्या म्हाताऱ्या पालकांबद्दल माहिती घेऊ इच्छित असाल तर गुगल मॅप तुम्हाला माहिती देऊ शकते. गुगल मॅप्सच्या मदतीनं तुम्ही हे देखील बघू शकता की तुमचे मुलं शाळेतून घरी पोचले आहेत की नाही. तुम्ही गुगल मॅप्स ऑनलाईन किंवा मोबाईल डिव्हाइसवर वापरू शकता आणि तुम्ही तुमची काळजी दूर करू शकता.

तुम्ही तुमच्या फोनवर गूगल मॅप्स डाऊनलोड करू शकता आणि तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांना रिअल टाईम प्लेस सुरू करण्यास सांगा. यानंतर, तुम्ही आणि ते दोघंही एकमेकांचं स्थान ट्रॅक करू शकणार आहात. तुम्ही हे फिचर वापरले नसणार तर तुम्हाला न्यू शेअरच्या पर्यायावर क्लिक करावं लागणार. तुम्ही लोकेशन शेअरिंग दरम्यान वेळ देखील निवडू शकता. जागा शेअर केल्यानंतर आपण दुसर्‍या स्थानासाठी विनंती करू शकता. एकदा जागा शेअर केल्यानंतर तुम्ही कोणत्याही ठिकाणी प्रवेश करू शकता. मोबाइलवर, आपण दिशानिर्देश आणि इतर माहिती देखील पाहू शकता.

संबंधित बातम्या

Google चे नवे नियम ऐकले नाहीत तर खरंच Gmail अकाउंट बंद होणार?

Take Right Turn नव्हे, ‘आता उजवीकडे वळा!’ Google Maps आता मराठीत मार्ग दाखवणार

(Google Maps gets Dark Mode on its android app for all user in world)