Free Antivirus | मोफत पळवा मोबाईलमधील व्हायरस, केंद्र सरकारने आणलं हे खास टूल

| Updated on: Oct 13, 2023 | 3:56 PM

Free Antivirus | तुमच्या मोबाईलमध्ये बॉट्स आणि मेलवेअर अजून पण आहेत का? अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही त्यांना हाकलवू शकता. त्यासाठी केंद्र सरकारने मोफत ॲन्टीव्हायरस , बॉट रिमूव्हर आणले आहे. केंद्र सरकारच्या या संकेतस्थळावरुन तुम्हाला हे टूल्स डाऊनलोड करता येतील. त्यामुळे तुमचा फोन सुरक्षित राहील.

Free Antivirus | मोफत पळवा मोबाईलमधील व्हायरस, केंद्र सरकारने आणलं हे खास टूल
Follow us on

नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : मालवेअर हल्ला आणि सायबर गुन्ह्याच्या प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भारतीय दूरसंचार विभागाने त्याविरोधात कंबर कसली आहे. गुगल प्ले स्टोअरसह अनेक ठिकाणी फ्री ॲन्टीव्हायरस सहज उपलब्ध असतात. पण ते बेसिक सेवा देतात. दर्जेदार सेवेसाठी त्यांचे पेड व्हर्जन घ्यावे लागते. पण केंद्र सरकारनेच नागरिकांच्या सोयीसाठी खास टूल्सची व्यवस्था केली आहे. त्यामाध्यमातून तुमच्या स्मार्टफोनमधील व्हायरस आणि बोटचा सफाया करता येतो. हँकर्स विविध व्हायरस तयार करतात. त्याआधारे तुमची महत्वपूर्ण माहिती चोरतात. त्यांना या टूल्सच्या माध्यमातून आळा घालता येईल. नागरिकांच्या डिजिटल सुरक्षेसाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून मॅसेज आला का

केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने त्यासाठी पाऊल टाकलं आहे. नागरिकांचे स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी विभागाने अनेक बॉट रिमुव्हल टूल्स समोर आणले आहेत. त्याच्या मदतीने तुमचा स्मार्टपोन सुरक्षित राहील. हे टूल्स काही महिन्यांपूर्वची लॉन्च करण्यात आले आहेत. तुमचा डिव्हाईस मालवेअरपासून सुरक्षित राहील. त्यासाठी या विभागाकडून नागरिकांना SMS पण पाठविण्यात येत आहे. पण कोणत्याही मॅसेजमधील लिंकवर जाणे धोक्याचे असते, त्यामुळे त्याविषयीची काळजी घ्या.

हे सुद्धा वाचा

असे करा डाऊनलोड

मोबाईलमधील मालवेअर, व्हायरस, बोट काढण्यासाठी हे टूल्स उपयोगी पडतील. त्यासाठी सर्वात अगोदर केंद्र सरकारच्या www.csk.gov.in/  या संकेतस्थळावर जा. त्यातील सिक्युरिटी टूल्स या पर्यायावर क्लिक करा. ज्या कंपनीचे बॉट रिमूव्हल टूल वापरायचं आहे ते क्लिक करा. हे ॲप सुरु करा. ॲप मोबाईलला स्कॅन करते. व्हायरस अथवा मेलवेअरची माहिती देते. CERT-In कडून ‘फ्री बॉट रिमूव्हल टूल’ डाउनलोड केल्यानंतर मोबाईलमधील बॉट पण नष्ट होतात.

संगणक ठेवा असा सुरक्षित


केंद्र सरकारने संगणकाच्या सुरक्षेसाठी पण प्रणाली विकसीत केली आहे. CSK पोर्टलवर USB Pratirodh आणि AppSamvid हे दोन ॲप देण्यात आले आहेत. ते डाऊनलोड करुन तुम्ही संगणकातील व्हायरसला पळवू शकता. ते रिमूव्ह करु शकता. त्यामुळे संगणकातील व्हायरस नष्ट होतील.