मुंबई : सोशल मीडिया हे कमाईचं उत्तम साधन झालं आहे. अनेक जण महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई करतात हे तु्म्ही ऐकलं असेलच. सोशल मीडियाचे नियम बदलल्यानंतर बराच फरक देखील पडतो. पण असं असूनही अनेक जण नवी नीति अवलंबत कमाई करतात. आता रिल्स जमाना असून इन्स्टाग्रामवर रिल्सच्या माध्यातून लाखो रुपयांची कमाई करू शकतो. तसं पाहिलं तर जगाच्या तुलनेत भारतात इन्स्टाग्रामचे सर्वाधिक युजर्स आहेत. भारतात 229 मिलियन इन्स्टाग्राम युजर्स आहेत. त्यानंतर दुसरा क्रमांक अमेरिकेचा लागतो. अमेरिकेत 143 मिलियन युजर्स आहेत. तर ब्राझील 113 मिलियन युजर्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. आज आम्ही तुम्हाला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पैसे कसे कमावयचे याबाबत सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पण तरीही तुमच्या मनात अनेक प्रश्न घर करून असतील तर चिंता करू नका. कारण येथे तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल यात शंका नाही. चला जाणून घेऊयात इन्स्टाग्रामवरून महिन्याला कशी कमाई करायची.
इन्स्टाग्रामवर तुम्ही रिल्सच्या माध्यमातून चांगली कमाई करू शकता. फक्त तुम्हाला इन्स्टाग्राम अकाउंटवरून रिल्स बनवून पोस्ट करावे लागतील. फक्त ज्या अकाउंटवरून रिल पोस्ट करणार आहात त्या अकाउंटची रिच चांगली असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही तुमचं पेड प्रमोशन करु शकता.या पद्धतीने कंटेंट क्रिएटर्स लाखोंची कमाई करतात. इतकंच नाही तर कमाईचं एक माध्यम आहे. घरबसल्या तु्म्हीही लाखो रुपयांची कमाई करू शकता.
इन्स्टाग्राम पोस्टमधून तु्ही लाखो रुपयांची कमाई करु शकता. या माध्यमातून अनेक युजर्स लाखोंची कमाई करतात. जर तुम्हालाही इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून पैसे कमावयचे असतील तर सर्वात आधी तुम्ही तुमचं इन्स्टाग्राम अकाउंट पॉप्युलर करा. अनेक इन्स्टाग्राम युजर्संचं खातं पॉप्युलर असल्याने पोस्टच्या माध्यमातून कमाई करत आहेत. या माध्यमातून तु्म्ही थेट क्लाइंटकून पैसे कमवू शकता.
तुमचं इन्स्टाग्राम अकाउंट पॉप्युलर असेल तर तुम्ही इन्स्टाग्राम अडवरटायझिंगचाही फायदा घेऊ शकता. या फिचरच्या माध्यमातून डायरेक्ट इन्स्टाग्राम साईडवरून पैसे कमवू शकता. पण यासाठी तुमचं इन्स्टाग्राम अकाउंट पॉप्युलर असणं गरजेचं आहे. तुमच्या अकाउंटवरून पोस्ट जितकी व्हायरल होणार तितकी कमाई होणार, हे सोपं गणित आहे.