earthquake alerts system
Image Credit source: socialmedia
नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023 : भूकंपाच्या धक्क्याने होत्याचे नव्हते होऊन जाते. भूकंपात इमारती आणि घरे कोसळल्याने अनेकांचे मृत्यू होतात. आता गुगलने भारतीय ग्राहकांसाठी एक तंत्रज्ञान आणले आहे. या तंत्रामुळे भूकंप येणार असल्याची सूचना आपल्या आगाऊ मिळणार आहे. गुगल आपल्या एड्रॉईड युजर्सकरीता ही सुविधा लॉंच करणार आहे. गुगलने भारतीय ग्राहकांसाठी आणलेल्या तंत्रज्ञानाने आपला मोबाईल आपल्याला भूकंप होण्याआधी अलर्ट करणार आहे. गुगलची ही सुविधा ( Android Earthquake Alerts system ) भारताबाहेर आधीच उपलब्ध आहे. भारतात ही सुविधा राष्ट्रीय नैसर्गिक संकट व्यवस्थापन प्राधिकरण ( NDMA ) आणि राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र ( NSC ) यांच्याशी चर्चा केल्यानंतर लागू केली जात आहे.
भूकंप डीटेक्टर होणार मोबाईल फोन
गुगलच्या एड्रॉईड भूकंप अलर्ट सिस्टीममुळे युजरचा फोनचे रुपांतर एका भूकंप डिटेक्टरमध्ये होणार आहे. जर तुमचा मोबाईल चार्ज होत असेल आणि एका जागी स्थिर असेल तर तो भूकंपाच्या पहिल्या संकेताला ओळखू शकतो. अशा अनेक मोबाईल फोननी एकाच वेळी भूकंपाच्या झटक्यांना ओळखल्याने गुगलचा सर्व्हरला भूकंप येत आहे आणि तो किती वेगाचा आहे हे समजू शकते.
- Google च्या भूकंप सूचना प्रणालीची विशेष वैशिष्ट्ये
- भूकंपाची दोन वर्गवारी करुन अलर्ट दिला जाईल.
- MMI 3 आणि 4 कंपनांवर 4.5 मॅग्नीट्यूड किंवा त्यापेक्षा जादा Be Aware Alert मिळेल
- MMI 5 + कंपनावर 4.5 मॅग्नीट्यूड किंवा त्यापेक्षा ज्यादा Take Action Alert मिळेल
- मोठा भूकंपाच्या स्थितीत फोनमध्ये do not disturb सेटिंगनंतरही स्क्रीन ऑन होऊन वेगाने वाजेल
- मोबाईल जोराने वाजेल आणि स्क्रीनवर भूकंपापासून वाचण्याचे उपायही दिसतील
केव्हा पासून सुविधा मिळणार
- गुगलच्या एड्रॉईड भूकंप अलर्ट सिस्टमचा वापर पुढच्या आठवड्यापासून करता येईल. जे युजर्स android 5 किंवा यापेक्षा वेगळ्या एड्रॉईड व्हर्जनचा वापर करतात त्यांना लोकेशन सेटींगसोबत भूकंप अलर्ट सिस्टमचा फायदा घेऊ शकतात. मोबाईल फोनवर भूकंपाचा अलर्ट मिळण्यासाठी इंटरनेट लागेल. तसेच फोनमध्ये लोकेशन सेटींग देखील चेक करावे लागेल. earthquake alerts ला टर्न ऑन करुन या सुविधेचा वापर करता येईल.
Earthquake सेटींग टर्न ऑन अशी करा
- आधी फोनच्या सेटींग मध्ये जावे, नंतर सेफ्टी एण्ड इमर्जन्सी ऑप्शनवर जावे, आता अर्थक्वेक अलर्टवर टॅप करावे, त्यानंतर अर्थक्वेक अलर्ट ला टर्न ऑन करावे लागेल. तर तुमच्या फोनमध्ये सेफ्टी एण्ड इमर्जन्सी ऑप्शन दिसत नसेल तर लोकेशनवर टॅप करावे लागेल. त्यानंतर एडव्हान्स आणि एर्थक्वेक अलर्टवर क्लिक करु शकता