Twitter : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एलन मस्क यांनी ट्विटरवर केलं फॉलो, नेटकऱ्यांनी विचारले असे प्रश्न

| Updated on: Apr 10, 2023 | 6:17 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूरळ टेस्ला आणि ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनाही पडली आहे. स्वत:च्या मालकीच्या ट्विटरवर त्यांनी नरेंद्र मोदी यांना फॉलो करण्यास सुरुवात केली आहे.

Twitter : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एलन मस्क यांनी ट्विटरवर केलं फॉलो, नेटकऱ्यांनी विचारले असे प्रश्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर एलन मस्क यांनी फॉलो करण्याचं कारण काय? जाणून घ्या नेटकऱ्यांचं म्हणणं
Follow us on

मुंबई : एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडत आहेत. ट्विटरच्या ब्लू टिकसाठी पैसे ते लोगो बदलण्यापर्यंत बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे एलन मस्क गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. तडकाफडकी घेत असलेले निर्णय पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. असं असताना आता एलन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. एलन मस्क यांच्या खात्यावर नजर असलेल्या व्हेरिफाईड एलन अलर्ट्स ट्विटर खात्याने याबाबतची माहिती दिली आहे.

एलन मस्क यांनी मागच्या वर्षी 44 बिलियन डॉलर्स खर्च करून ट्विटर खरेदी केलं आहे. तसेच ट्विटर खरेदी केल्यानतर सीईओ पराग अग्रवाल यांना घरचा रस्ता दाखवला. या व्यतिरिक्त ट्विटरची चिमणी हटवून कुत्र्याचा लोगो ठेवला होता. त्यानंतर चारच दिवसात ब्लू बर्डने पुन्हा आगमन केलं. आता ट्विटरचा लोगा पूर्वीसारखा दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर 87.7 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत. आता या यादीत एलन मस्क यांचंही नाव सहभागी झालं आहे. दुसरीकडे टेस्ला आणि ट्विटरचे सीईओ एलन मस्क फक्त 195 लोकांनाच फॉलो करतात.

 

टेस्ला कंपनीच्या गाड्या भारतात लाँच करण्याबाबत भारत सरकारनं नाड्या आवळल्यात. त्यात गाड्या भारतात तयार करण्याची अट घातली आहे. त्यामुळे भारतीय बाजारात टेस्ला गाड्यांची अजूनही प्रतिक्षा आहे. दुसरीकडे, एलन मस्क हे सहजासहजी कोणाला फॉलो करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या या कृतीबाबत नेटकरी वेगवेगळा अंदाज लावत आहेत.

टेस्ला कंपनीच्या गाड्या भारतात लाँच होणार की नाही याबाबत अजूनपर्यंत कोणतीच अधिकृत माहिती नाही. त्यात सोशल मीडियावर काही मजेशीर ट्वीट देखील व्हायरल होत आहेत.

एलन मस्क यांनी बराक ओबामा यांना मागे टाकत सर्वाधिक ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. एलन मस्क यांना ट्विटरवर 134.3 मिलियन युजर्स फॉलो करतात. दुसरीकडे बराक ओबामा यांना 133.04 मिलियन लोकं फॉलो करतात.

ट्विटरवर महिन्याला जवळपास 450 मिलियन अॅक्टिव्ह युजर्स असतात. त्यापैकी 134.3 मिलियनं लोकं एलन मस्क यांना फॉलो करतात. ट्विटर विकत घेण्यापूर्वी एलन मस्क यांचे 110 मिलियन युजर्स होते. मात्र गेल्या पाच महिन्यात 24.3 मिलियन फॉलोअर्सची भर पडली आहे.