Elon Musk ने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) ताब्यात घेतल्यापासून त्याचे प्रयोग काही थांबलेले नाही. त्याने आतापर्यंत अनेक मोठे निर्णय घेतले आहे. आता मस्क युझर्सला झटका देण्याच्या तयारीत आहे. Blue Tick साठी मस्कने अगोदरच युझर्सकडून वसुली सुरु केली आहे. आता पुन्हा एकदा X यूजर्सकडून पैसे वसूल करणार आहे. आता एक्सवरील एखादी पोस्ट लाईक करणे, त्या पोस्टवर रिप्लाय देणे एवढेच नाही तर बुकमार्क करण्यासाठी सुध्दा ग्राहकांचा खिसा कापल्या जाणार आहे. त्यासाठी युझर्सला पैसे मोजावे लागतील. आता या निर्णयामुळे युझर्सने डोक्यावर हात मारला आहे.
X New User Fees : का घेतला मस्कने हा फैसला ?
एका वृत्तानुसार, एलॉन मस्क याने बॉट्सच्या कारणामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे. मस्क याने X अकाउंटवरील युझर्सच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. बॉट्सच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी शुल्क वसुलीचा निर्णय घेण्यात आला आहे.
नियम सर्वांनाच लागू
मस्कने या नियमाविषयीची माहिती दिली. त्यानुसार, हा नियम या प्लॅटफॉर्मवरील सर्वच युझर्सला लागू असेल. नवीन युझर्सला पण पैसे मोजावे लागणार आहेत. नवीन खाते तयार करणारे युझर्स तीन महिन्यानंतर कोणतेही शुल्क न भरता युझर्स पोस्ट करु शकतील. गेल्यावर्षी मस्कने फिलिपीन्स आणि न्युझीलंडमधील नवीन युझर्ससाठी वार्षिक 1 डॉलर शुल्क आकारणी सुरु केलेली आहे.
बोगस अकाऊंट केले बंद
एलॉन मस्क यांने मायक्रोब्लॉगिंक प्लॅटफॉर्म एक्सवरील अनेक बोगस, डप्लिकेट आणि फसवी खाती बंद केली आहे. या वर्षी 26 फेब्रुवारी ते 25 मार्च या दरम्यान जवळपास 2 लाख 13 हजार X अकाऊंट्स बंद करण्यात आली आहे. ही खाती एक्सच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले होते.
X वर प्रौढांसाठीचा कंटेट
प्रौढ कंटेंटसाठी एक्सवरील युझर्स कम्युनिटी तयार करु शकतील. त्यांना सेटिंगमध्ये याविषयीची माहिती लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याविषयीचा स्क्रीनशॉट ॲनालिस्ट Daniel Buchuk यांनी शेअर केला आहे. डॅनिअल ॲप्स विकसाबाबत माहिती जमा करतो आणि त्याविषयी युझर्सला अपडेट देतो. एक्सच्या सेटिंगमध्ये लवकरच साधं कंटेंट तर प्रौढ कंटेंट अशा नामफलक, लेबल लागलेले असेल. ते युझर्सच्या सहज नजरेत येईल.