नवी दिल्ली | 25 सप्टेंबर 2023 : अब्जाधीश इलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी आपल्या Tesla Robot चा नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. हा एक humanoid robot आहे. टेस्लाचा हा नवा रोबोट खूपच स्मार्ट आहे. यासंदर्भात इलॉन मस्क यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत रोबोट सर्वांना नमस्कार करताना दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन दिलेले नाही. तरीही व्हिडीओला सब टायटल दिलेले आहेत. मस्क यांनी या रोबोटला काही टास्क पूर्ण करण्यास सांगितले आणि त्याने ते लिलया पूर्ण केले आहेत. इतकंच काय तर हा रोबो वस्तूंचे रंग देखील ओळखतो.
प्रसिध्द उद्योजक अब्जाधीश इलोन मस्क यांनी एक्सवर ( ट्वीटर ) एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात एक मानवाप्रमाणे काम करणारा रोबोट दिसत आहे. याला रोबोला विविध टास्क देण्यात आले आहेत. रोबोट काही टास्क पूर्ण केल्यानंतर नमस्ते आणि योगासने करताना दिसत आहे. या दोन विविध रंगाचे बॉक्स वेगवेगळ्या प्लेटमध्ये रंगानूसार ठेवण्याचे काम रोबोट सहजतेने करताना दिसत आहे. हा रोबोट निरनिराळ्या टास्क सहज शिकतो.
इलॉन मस्क यांनी केलेले ट्वीट –
— Elon Musk (@elonmusk) September 25, 2023
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले इलॉन मस्क यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत सबटायटल्स आहेत. त्यांनी दाखवले आहे की कसा ह्युमनोईड रोबोट आपल्या हातापायांचा हालचाली कशा पाहू शकतो. रोबोट केवळ व्हीजन आणि जॉईंट पोझिशन एनकोडरच्या मदतीने आपल्या हालचालीचा शोध घेऊ शकतो. काही अहवालात म्हटले आहे की या रोबोटला स्पेस मिशनमध्ये देखील वापरले जाऊ शकते.
Optimus नावाच्या या रोबोटची किंमत जवळपास 20,000 डॉलर ( 16,61,960 रुपये ) इतकी असू शकते. मिडीयातील वृत्तानूसार Humanoid Robot मध्ये 3 किलोवॅट प्रति तासाची बॅटरी पॅक आहे. त्यामुळे तो दिवसभर आरामात काम करु शकतो. या रोबोटला wifi आणि LTE चा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या रोबोटला टेस्ला कारच्या ऑटोपायलटमध्ये असलेल्या एडव्हान्स ड्राईव्हर असिस्टेंड सिस्टीममधील आर्टीफिशियल इंटेलिजंस सॉफ्टवेअर आणि सेंसरचा वापर केला आहे. हा रोबोट टेस्ला चिपवर काम करतो.