WhatsApp वर मिळणार बंद खोली सारखी प्रायव्हसी, कपल्सला या फीचर्सची माहिती हवीच

| Updated on: Jan 02, 2025 | 1:00 AM

व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक महत्त्वपूर्ण फीचर्स आहेत. डिसअपियरिंग मेसेजेसमुळे तुमची खासगी चॅट सुरक्षित राहते, तर स्टेटस गोपनीयता सेटिंग्जमुळे तुम्ही तुमचे स्टेटस निवडक लोकांसोबतच शेअर करू शकता. ग्रुपमध्ये अॅड होण्याची परवानगी नियंत्रित करण्याचा आणि प्रोफाइल फोटो गोपनीयता सेट करण्याचा पर्यायही आहे. या सर्व फीचर्सचा वापर करून तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप अॅकाउंटची सुरक्षा वाढवू शकता.

WhatsApp वर मिळणार बंद खोली सारखी प्रायव्हसी, कपल्सला या फीचर्सची माहिती हवीच
whatsapp
Image Credit source: Meta AI
Follow us on

भारतात इतर सोशल मीडियापेक्षा व्हाट्सअप सर्वाधिक वापरलं जाणारं अॅप आहे. व्हॉट्सअप ज्याच्याकडे नाही असा एकही माणूस शोधून सापडणार नाही. आता व्हॉट्सअपच्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाटी काही कामाचे फिचर्सही देण्यात आले आहेत. अत्यंत महत्त्वाचे अॅपही व्हॉट्सअपने दिले आहेत. त्यातून अनेक महत्त्वाच्या माहितीपूर्ण माहिती मिळतात. तुम्हीही व्हॉट्सअप वापरत असाल, तर आजची ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही आपल्याला व्हॉट्सअपमधील काही सुरक्षा आणि गोपनीयतेचे फीचर्स सांगणार आहोत, जे प्रत्येक यूजर आणि प्रत्येक कपल्सला माहीत असलेच पाहिजे.

WhatsApp Disappearing Messages

व्हॉट्सअपमध्ये यूजर्सची सुरक्षा आणि गोपनीयतेचा विचार करत डिसअपियरिंग मेसेजेस फीचर दिले आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला डिसअपियरिंग मेसेज पाठवल्यावर एका निश्चित कालावधीनंतर तो मेसेज आपोआप डिलीट होतो.

हे फीचर खूप महत्त्वाचे आहे. कारण यामुळे तुमची खासगी चॅट सुरक्षित राहते. हे फीचर ऑन करण्यासाठी, सर्वप्रथम ज्यांच्याशी खासगी चॅट करणार आहात, त्यांचे चॅट ओपन करा. चॅट ओपन केल्यावर, थ्री डॉट्सवर क्लिक करून डिसअपियरिंग मेसेज ऑप्शनवर टॅप करा. हे फीचर कपल्ससाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण दोघांच्याही वैयक्तिक चॅट काही वेळाने डीलिट होतात. कधी कधी खासगी चॅट डीलिट केल्या जात नाहीत. त्या कुणाच्या तरी नजरेस पडल्यास प्रकरण महागात पडू शकतं. म्हणूनच डिसअॅपरिंगचा पर्याय आला आहे.

स्टेटस अपडेट्स

स्टेटस लावण्यापूर्वी तुम्हाला स्टेटसची गोपनीयता बदलण्याचा पर्याय मिळतो. व्हॉट्सअपमध्ये यूजर्सच्या सोयीसाठी हे फीचर दिलं आहे. त्यामुळे आपण आपले स्टेटस फक्त त्या लोकांसोबत शेअर करू शकता, ज्यांसोबत आपण ते शेअर करू इच्छिता. स्टेटस अपडेट करताना, आपल्याला हा पर्याय दिसतो. तुम्हाला ज्यांना तुमचे स्टेट्स दाखवायचे आहे त्यांनाच सिलेक्ट करू शकता. किंवा ज्यांना स्टेट्स दिसू नये वाटतं त्यांचे नंबर यात सिलेक्ट करू शकता.

सेटिंग्ज बदला

एकेकाळी आपण कोणालाही कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करू शकायचो. त्यामुळे यूजर्सची गोपनीयता आणि सुरक्षे संदर्भात प्रश्न उभे राहिले. त्यानंतर, कंपनीने व्हॉट्सअपमध्ये एक कामाचा फीचर जोडले आहे. त्यामुळे आता कुणालाही ग्रुपमध्ये आपण अॅड करू शकणार नाही.

आपण व्हॉट्सअप सेटिंग्समधील प्रायव्हसी सेक्शनमध्ये थोडे खाली स्क्रोल केल्यावर “ग्रुप्स” ऑप्शन दिसेल, जिथे आपण परमिशन सेट करू शकता की फक्त ते लोकच आपल्याला ग्रुपमध्ये अॅड करू शकतील.

प्रोफाइल फोटो

जर तुम्ही कपल असाल आणि व्हॉट्सअपवर एकमेकांसोबत आपली प्रोफाइल पिक्चर सेट केली असेल, आणि आपल्याला ती पिक्चर इतरांपासून गुप्त ठेवायची असेल, तर आपल्याला व्हॉट्सऐप सेटिंग्समधील प्रायव्हसी सेक्शनमध्ये जाऊन “प्रोफाइल फोटो” ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.