मुंबई : एलोन मस्कनं (elon musk) ट्विटर (Twitter) विकत घेतल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर सतत चर्चेत असते. आता सीईओ पराग अग्रवाल (parag agrawal) यांनी कंपनीच्या दोन उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. यासोबतच कंपनीत नव्या नोकरभरतीवर बंदी घालण्यात आली आहे. ट्विटरनं गुरुवारी पुष्टी केली की दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. संशोधन, डिझाइन आणि अभियांत्रिकी विभागांचे नेतृत्व करणारे महाव्यवस्थापक कायवान बेकपौर आणि महसूल महाव्यवस्थापक ब्रूस फॉक हे दोघेही पद सोडत आहेत. त्याचवेळी बेकपोर यांनी ट्विट करून याची पुष्टी केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, ‘सत्य हे आहे की मी ट्विटर सोडण्याची कल्पना कशी आणि केव्हा केली आणि तो माझा निर्णय नव्हता. मला कंपनीला वेगळ्या दिशेने घेऊन जायचे आहे, असं सांगून पराग यांनी जायला सांगितलं. त्यांनी ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
Interrupting my paternity leave to share some final @twitter-related news: I’m leaving the company after over 7 years.
हे सुद्धा वाचा— Kayvon Beykpour (@kayvz) May 12, 2022
Thank you to @dickc for taking the bet on @periscopeco and bringing us to Twitter in 2015, and to @jack for the opportunities and trust you gave me since.
— Kayvon Beykpour (@kayvz) May 12, 2022
ट्विटरचे महसूल महाव्यवस्थापक ब्रूस फॉकन यांनीही ट्विटरमधून जाण्याच्या वृत्ताला दुजारो दिला आहे. त्यांनी ट्विट केले , “गेल्या 5 वर्षांत ज्या संघांसोबत काम करण्याचे भाग्य लाभले त्या सर्व संघांचे आभार मानण्यासाठी मला थोडा वेळ घ्यायचा होता. हे व्यवसाय तयार करणे आणि चालवणे हा एक सांघिक खेळ आहे.”
Everything this team has done and will do sits on the shoulders of the giants that did this work – those dedicated IC engineers who seldom see the spotlight or get the recognition they deserve. The unsung heroes that make Goldbird (and Twitter) what it is
— bruce.falck() ? (@boo) May 12, 2022
I dedicate this Tweet to those engineers and thank you ALL for the opportunity to serve alongside you. It’s been awesome. There is a lot more to do so get back to work, I can’t wait to see what you build #TIF
— bruce.falck() ? (@boo) May 12, 2022
ट्विटरचे सीईओ अग्रवाल यांनी अधिकृत ईमेलमध्ये एका अहवालानुसार नोकरभरतीची कोणतीही नवीन योजना नाही, असे त्यांनी स्पष्ट केले असले तरी, याक्षणी कोणतीही टाळेबंदी नाही, असा दावा ब्लूमबर्गच्या अहवालात करण्यात आला आहे. पराग अग्रवाल यांनी या उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकण्यामागे अनेक कारणे सांगितल्याचं कळतं. महसूल निर्माण करण्यात त्यांच्या अपयशाची चर्चा ईमेलमध्ये करण्यात आली आहें.
इलॉन मस्क ट्विटरमध्ये कोणते बदल घडवून आणतील याची कोणालाच कल्पना नाही, परंतु संभाव्य बदलाची सर्वांनाच चिंता आहे कारण एलोन मस्क त्यांच्या आश्चर्यकारक निर्णयांसाठी ओळखले जातात. द हॅरिस पोलच्या मते, मस्कने ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर 59 टक्के अमेरिकन आनंदी आहेत, तर सध्याच्या ट्विटर कर्मचार्यांना चिंता आहे की मस्क कंपनीमध्ये नाट्यमय बदल करू शकतात.