कोल्हापूर : गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाल्याने एका तरुणाला आपला डोळा गमावावा लागला आहे. अमोल पाटील (16) असे या जखमी मुलाचे नाव आहे. कोल्हापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील उंदरवाडी परिसरात अमोल पाटील राहतो. अमोलचे आई-वडिल शेतात गेल्याने तो घरी मोबाईलवर गेम खेळत होता. गेम खेळत असताना मोबाईल गरम होऊन त्याचा स्फोट झाला. या स्फोटामुळे त्याच्या हाताला जखम झाली असून, मोबाईलचा एक तुकडा अमोलच्या डोळ्यात घुसला.
या प्रकरणानंतर अमोलला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र डॉक्टरांनी त्याचा एक डोळा निकामी झाल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान या घटनेमुळे परिसरात अनेकांना धक्का बसला.
अनेकदा मोबाईलवर गेम खेळत असताना आपण भान हरपतो. आपल्या हातात किती वेळ मोबाई आहे. तो गरम झाला आहे या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे असे अपघात होत असल्याच्या घटना वारंवार समोर येतात.
गेल्या काही वर्षांपासून मोबाईल स्फोट होण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. मोबाईल चार्जिंगला असताना, चार्जिंग लावून फोनवर बोलत असताना, गेम खेळताना अचानक स्फोट झाल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. यामुळे लहान मुलांना मोबाईल पासून लांब ठेवणं गरजेचं आहे.
संबंधित बातम्या :
अंबरनाथमध्ये चार्जिंगला लावलेल्या आयफोनचा स्फोट
औरंगाबादेत मोबाईल बॅटरीशी खेळताना स्फोट, दोन मुलं जखमी
ऑनलाईन मागवलेल्या मोबाईलचा स्फोट, चिमुकल्याच्या हाताची पाचही बोटं तुटली!