Facebook आणि Instagram वर आता 18 वर्षांखालील मुलांचे अर्धनग्न फोटो शेअर होणार नाहीत, ‘Take It Down’ टुल लॉंच

| Updated on: Apr 11, 2023 | 12:58 PM

लहान मुले इंटरनेटचा वापर जास्त करतात. ते सहज कोणत्याही जाळ्यात अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे 'टेक इट टूल' आता असे कामी येणार आहे.

Facebook आणि Instagram वर आता 18 वर्षांखालील मुलांचे अर्धनग्न फोटो शेअर होणार नाहीत, Take It Down टुल लॉंच
meta
Image Credit source: gettyimages
Follow us on

नवी दिल्ली : सोशल साईट Facebook आणि Instagram वर आता 18 वर्षांखालील मुलांचे अर्धनग्न फोटो शेअर करता येणार नाहीत. सोशल मिडीया कंपनी मेटाने युजरसाठी टेक इट टुल लॉंच केले आहे. या टूलच्या मदतीने आता लहानग्यांच्या संबंधित न्यूड कटेंट सर्क्यूलेट होण्यापासून रोखता येणार आहे. या टूलला नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अ‍ॅण्ड एक्सप्लोइटेड चिल्ड्रनद्वारा ऑपरेट केले जात आहे. सेक्सटॉर्शनची प्रकरणे रोखणे आणि लोकांची प्रायव्हसी जपण्यासाठी या टूलला लॉंच करण्यात आले आहे. हे कसे काम करणार ते पाहूया…

जूने फोटो देखील होणार ब्लॉक

या नव्या ‘टेक इट टूल’ मुळे या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर जर याआधी देखील अपलोड केलेल्या न्यूड फोटोंना देखील हटविणे आणि त्या इंटरनेटवर पसरविण्यापासून रोखण्यास मदत होणार आहे. सोशल मिडीयावर न्यूड कंटेंट आजकाल वेगाने सर्क्यूलेट होत आहे. त्याद्वारे लोकांना ब्लॅकमेल केले जात आहे. भारतात इंटरनेट युजरची संख्या प्रचंड मोठी आहे. यातील काही अठरा वर्षांखालील लोकसंख्याही जास्त आहे. लहान मुले इंटरनेटचा वापर जास्त करतात. ते सहज कोणत्याही जाळ्यात अडकण्याची शक्यता असते. त्या लोक त्यांचा सहज गैरवापर करण्याची शक्यता अधिक आहे. परंतू आता यावर लगाम लागणार आहे.

या वर्षअखेर भारतात लॉंच

‘टेक इट डाऊन’ टूलच्या मदतीने जर कुठल्या युजरने फोटोला रिपोर्ट केला तर त्या फोटोचे डिजिटल फिंगरप्रिंट तयार होईल. ज्याला Hashes असे म्हणतात. त्यामुळे तो फोटो कोडमध्ये परिवर्तित होईल. त्यामुळे त्या फोटोला कोणतीही व्यक्ती पाहू शकणार नाही. या टूलमध्ये एक खास वैशिष्ट्ये आहे की एका वेळी फोटोला रिपोर्ट केल्यानंतर त्याच्या सारखे  प्लॅटफॉर्मवर जेवढे फोटो असतील ते सर्व ओपन होणार नाहीत. म्हणजेच ब्लॉक होतील. जर कोणी त्या फोटोला अपलोड करण्याचा प्रयत्न करेल तरी ते शक्य होणार नाही. मेटाने म्हटले आहे की या टूल ला या वर्षअखेर भारतात लॉंच केले जाईल, आणि येत्या काळात रिजनल लॅग्वेजमध्येही मध्ये हा बदल पाहायला मिळेल.

यात आहे एक अडचण

या टूलमध्ये एक अडचण अशी आहे की जर कुठला नग्न फोटो कोणी सेव्ह करून त्याला एडीट करून पुन्हा अपलोड करीत सर्क्यूलेट करेल तेव्हा ही इमेज ब्लॉक होणार नाही, कारण हे टूल त्या इमेजला नविन इमेज समजेल. आणि ओळखू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्या इमेजला पुन्हा रिपोर्ट करावे लागेल मग ते सर्क्युलेट होणार नाही.