फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप डाऊन, फोटो लोड होण्यास अडथळा

| Updated on: Jul 03, 2019 | 9:05 PM

फेसबुकवर कोणताही फोटो लोड होत नाही, तर व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरही हीच परिस्थिती आहे. व्हॉट्सअपवर फोटो डाऊनलोड होत नसल्यामुळे अनेक युझर्सने ट्विटरवर तक्रार केली आहे. डाउनडिटेक्टरच्या मते, सायंकाळपासूनच ही समस्या सुरु आहे.

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप डाऊन, फोटो लोड होण्यास अडथळा
Follow us on

मुंबई : सोशल मीडियाचा आत्मा असलेलं फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम डाऊन झालंय. यामुळे फोटो लोड होण्यास अडथळा निर्माण झालाय. फेसबुकवर कोणताही फोटो लोड होत नाही, तर व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरही हीच परिस्थिती आहे. व्हॉट्सअपवर फोटो डाऊनलोड होत नसल्यामुळे अनेक युझर्सने ट्विटरवर तक्रार केली आहे. डाउनडिटेक्टरच्या मते, सायंकाळपासूनच ही समस्या सुरु आहे.

अनेकांचं फेसबुक लॉग इन होण्यासही अडथळा होतोय, तर फोटोसाठी प्रसिद्ध असलेलं इंस्टाग्रामही डाऊन झालंय. व्हॉट्सअपवर फोटो डाऊनलोड न झाल्याने अगोदर युझर्सने नेटवर्क प्रॉब्लम समजून दुर्लक्ष केलं. मात्र अनेकांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर हा अडथळा सर्वांसाठीच असल्याचं समोर आलं. फेसबुक फीडमध्ये एकही फोटो लोड होत नाही, ज्यामुळे फेसबुक डाऊन झालंय.

https://twitter.com/postmalonelines/status/1146439483098714112

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप डाऊन होण्यामागचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही. यापूर्वीही अनेकदा असा तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. कंपनीकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. भारतात सोशल मीडियाचा वापर सर्वात जास्त होतो. त्यामुळे सर्वाधिक व्हॉट्सअप युझर असलेल्या भारतामध्ये या समस्येमुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

https://twitter.com/Samikenya/status/1146440795312087042