मुंबई : सोशल मीडिया म्हंटलं की पहिलं डोळ्यासमोर फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम येतं. फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरणारे युजर्स दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे असून भारतात ही संख्या सर्वाधिक आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे युजर्स भारतात दिवसागणिक वाढतच आहेत.भारतात 32.9 कोटी लोकं फेसबुक वापरतात. तर इन्स्टाग्राम वापरण्याची 22.9 कोटी इतकी आहे. पण आता मार्क झुकरबर्क यांच्या मालकीच्या मेटा कंपनीने फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्ससाठी पेड सब्सक्रिप्शन सुरु करण्याची घोषणा केली आहे. ब्लू बॅज व्हेरिफिकेश करणाऱ्यांना युजर्संना आता ट्विटरप्रमाणे पैसे मोजावे लागणार आहेत.फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्स सरकारी ओळखपत्राच्या माध्यमातून आपलं खातं व्हेरिफाईड करु शकतो. मात्र यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहे. वेब युजर्संना यासाठी 11.99 डॉलर म्हणजेच 993 रुपये भरावे लागतील. तर अँड्रॉईड आणि आयओएस युजर्संना 14.99 डॉलर्ल म्हणजेच 1241 रुपये मोजावे लागतील.सध्या ही सर्व्हिस ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमध्ये सुरु आहे.
भारतात फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे जवळपास 55 कोटी युजर्स आहेत. जर देशातील फेसबुक इन्स्टाग्राम युजर्स व्हेरिफिकेशन करुन घेतात. तर मेटा कंपनीला महिला 546 अब्ज 15 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे.भारतात 98 टक्के युजर्स मोबाईलधारक आहेत. जर मोबाईल धारकांसाठी असलेल्या पॅकेजचा विचार केला तर मार्क झुकरबर्ग यांची मेटा कंपनी भारतातून 682 अब्ज 55 कोटी रुपये कमवेल.
देशात फेसबुकचे सर्वाधिक युजर्स आहे.जवळपास 32.9 कोटी युजर्संनी व्हेरिफिकेशन केलं मेटा कंपनी महिना 993 रुपयांच्या हिशेबाने 317 अब्ज 76 कोटी रुपये कमवेल. 1241 रुपयांच्या हिशेबाने 397 अब्ज 12 कोटी रुपये कमवेल.पण सर्व युजर्संना यासाठी व्हेरिफिकेशन करणं आवश्यक नाही. त्यामुळे जे लोक व्हेरिफिकेशन करतील त्यानाच ही रक्कम भरावी लागेल.
फेसबुकप्रमाणे इन्स्टाग्राम युजर्सची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. देशात आतापर्यंत जवळपास 22.9 कोटी युजर्स आहेत. या युजर्संनी व्हेरिफिकेशन केलं तर 993 रुपयांच्या हिशेबाने महिना 228 अब्ज 39 कोटींची कमाई होईल. जर 1241 रुपयांने रक्कम भरली तर 285 अब्ज 43 कोटींची कमाई होईल.
व्हेरिफिकेश प्लानच्या माध्यमातून श्रीमंतीची स्वप्न पाहणारी मेटा कंपनीचे फेसबुकचे जवळपास 291 कोटी युजर्स आहेत. यामध्ये भारत पहिल्या, तर अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत तरी फेसबुकचं कमाईचं मुख्य साधन जाहिराती आहेत.एका मीडिया रिपोर्टनुसार फेसबुक जाहिरातीच्या माध्यमातून प्रत्येक तासाला 100 कोटींची कमाई करते. कंपनीची जवळपास 98 टक्के कमाई याच माध्यमातून होते.