जगभरात मेटाचा सर्व्हर डाऊन झाल्याने व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक आणि थ्रेड या मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या युजर्सना वापरकर्त्यांना बुधवारी रात्री जगभरात मेटा सर्व्हर डाउन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आउटेजचा सामना करावा लागला. भारतात रात्री 11 च्या सुमारास यूजर्सनी मेटा प्लॅटफॉर्मच्या आऊटेजबद्दल तक्रार करण्यास सुरूवात केली. अनेक यूजर्सना व्हॉट्सॲपवरून मेसेज पाठवण्यासही किंवा रिसीव्ह करण्यासही त्रास होत होता. एवढंच नव्हे तर चैटबॉट ChatGPT आणि OpenAI चा API तसेच Sora video जेनेरेटर प्लेटफॉर्म्स यावरही सर्व्हिस नीट सुरू नव्हती. त्याचप्रमाणे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि थ्रेडवर फीड अपलोड करताना समस्या येत होत्या. व्हॉट्सॲप व्यतिरिक्त मेटाकडे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि थ्रेड देखील आहे.
या चारही लोकप्रिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या यूजर्सना तासाभरापेक्षा जास्त काळ अडचणींचा सामना करावा लागला. मध्यरात्री 2च्या आसपास मेटाचे आऊटेज सुरळीत झाले आणि त्यानंतरच यूजर्सना त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉ्रमवरील अकाऊंट नीट वापरता येऊ लागले. मेटा प्लॅटफॉर्म बंद पडल्याबद्दल X ( पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तर मीम्सचा पूर आला होता. इलॉन मस्कच्या मालकीच्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सॲप डाऊन, इन्स्टाग्राम डाउन आणि फेसबुक डाउन असे ट्रेंड करण्यास सुरुवात केली. तसेच मेटा डाऊन आणि मार्क झुकरबर्गचे नावही तिथे ट्रेंडमध्ये होते. मीम्स, व्हिडिओ आणि ओपिनियनमच्या माध्यमातून युजर्स मेटा आणि झुकरबर्गला ट्रोल करताना दिसले.
मेसेज, पोस्ट आणि अपडेटचा ॲक्सेस हा युजर्ससाठी स्लो झाला होता, काही ठिकाणी तर तो उपलब्धच नव्हता. मेटा प्लॅटफॉर्मच्या डेस्कटॉप आणि मोबाइल व्हर्जन, दोन्हीकडे ही समस्या येत होती. युजर्स हे मेटा सपोर्ट साइट किंवा डाउनडिटेक्टर वेबसाइटवर या आउटेजबद्दल पोस्ट करत होते. डाउनडिटेक्टर ही अशी एक वेबसाइट आहे जिथे युजर्स टाइम झोन आणि भौगोलिक क्षेत्रानुसार सोशल मीडिया आणि इंटरनेट प्लॅटफॉर्मच्या वापरामध्ये समस्या किंवा साइट क्रॅश झाल्याची तक्रार नोंदवतात.
मेटाकडून निवेदन जारी
यानंतर मेटाकडून एक निवेदन जारी करण्यात आले होते. या सर्व्हिसेसच्या ग्लोबल आऊटेजबद्दल कंपनीला जाणीव असून व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि फेसबूक हे रिस्टोअर करण्याासाठी काम सुरू आहे असे त्यात नमूद करण्याच आले होते. या आऊटेजबद्दल बुधवारी रात्री 10.58 च्या सुमारास युजर्सनी रिपोर्ट करण्यास सुरूवात केलीय फेसबूक युजर्सना लॉग इन तसेच पोस्ट अपलोड करण्यात समस्या जाणवत होती. इन्स्टाग्रामवरही असाच प्रॉब्लेम येत होता. ते ॲप वारंवार क्रॅश होत होते. तसेच व्हॉट्सॲप यूजर्सनाही मेसेज पाठवण्यात आणि रिसीव्ह करण्यात अडचणी येत होत्या. मात्र मेटाने निवेदन जारी केल्यानंतर काही काळाने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि सर्व सेवा सुरळीत सुरू झाल्या.
We’re aware that a technical issue is impacting some users’ ability to access our apps. We’re working to get things back to normal as quickly as possible and apologize for any inconvenience.
— Meta (@Meta) December 11, 2024