Facebook : आली की नवलाई! फेसबुकने खरंच बदलवला Logo? तुम्ही लक्ष दिलं का

| Updated on: Sep 22, 2023 | 10:20 AM

Facebook : सध्या नव नवलाईचे दिवस आहेत. सर्वच जण मेकओव्हरमध्ये गुंगले आहे. फीट आणि फाईन दिसण्यासाठी माणसचं नाही तर कंपन्या पण मागे नाहीत. ट्विटरने तर बदलाची नांदी आणली आहे. नाव, लोगो आणि इतर अनेक बदल झाले आहेत. आता या यादीत फेसबुकने पण स्थान पटकावलं आहे. हा बदल जाणवला का?

Facebook : आली की नवलाई! फेसबुकने खरंच बदलवला Logo? तुम्ही लक्ष दिलं का
Follow us on

नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : बदल हीच शाश्वत गोष्ट आहे असे म्हणतात. सध्या मेकओव्हचं युग आहे. माणसांपासून घरं, कार्यालयं, दुकानं सर्व आता जमान्यानुसार बदलत आहेत. त्यात मोठंमोठ्या टेक कंपन्यांनी पण आघाडी घेतली आहे. ट्विटर तर मेकओव्हरचं दुकानंच घेऊन बसला आहे. ट्विटरचा मालक काही दिवसापूर्वी बदलला. एलॉन मस्क (Elon Musk Twitter X) येताच मोठा बदल झाला. ट्विटरचे नाव बदलले, लोक बदललीत, कार्यालयचं नाही तर फर्निचर पण बदललं. सरतेशेवटी लोगो बदलला. आणखी बरचे बदलं होऊ घातले आहे. तर या मेकओव्हरच्या नदीत फेसबुकनं पण हात धुवून घेतले आहे. पण ते कोणाच्या बहुधा लक्षात आले नाही. फेसबुकने खरंच त्यांच्या लोगोत (Facebook Changed Logo) बदल केला का? तुम्हाला हा बदल जाणवला का?

लोगो न्याहाळलात का

आता असाच प्रश्न जो तो वापरकर्ता विचारत आहे. फेसबुकने लोगोत काय बदल केला बरं? असा प्रश्न नेहमी फेसबुकवर पडीक असणाऱ्या युझर्सला पण पडला आहे. बदल केला तर तो दिसला कसा नाही. बदल जाणवत का नाही? असे त्यांचे काही भाबडे प्रश्न आहेत. तज्ज्ञ म्हणतात हीच तर जादू आहे. फेसबुकचा लोगो थोडा बारकाईने न्याहाळला तर हा बदल तुमच्या लक्षात येईल.

हे सुद्धा वाचा

बदल दिसतोय का

तर फेसबुकने नवीन लोगो दिला आहे. पण तो लक्षात येण्यासाठी तुमची तीक्ष्ण नजर हवी. काही तज्ज्ञ तर म्हणतात युझर्सने भिंग काच घेऊन हा बदल शोधावा. इतका सुक्ष्म बदल करण्यात आला आहे. ट्विटरच्या लोगो सारखा हा एकदम बदल झालेला नाही. तर लोगोत बदल अॅडजेस्ट केला आहे. कळलं ना? हेच तर वैशिष्ट्य आहे.

डिझायनर टीम प्रमुखांचं म्हणणं तरी काय

फेसबुक डिझायनर टीमचे प्रमुख Dave N यांनी फेसबुकच्या ब्लॉगवर याविषयीची माहिती शेअर केली आहे. फेसबुकची खास ओळख पुन्हा नव्याने दखल घेण्याजोगी करावी यासाठी टीमने काम केलं. नवीन लोगो हा एकदम ओळखीचाच, जवळचाच वाटावा ही आमची जबाबदारी होती. त्यामुळे तो आकर्षक, गतीशील आणि तितकाच मोहक वाटण्यासाठी काम केल्याचे त्यांनी सांगितले.

भावा बदल तरी काय झाला

तर f या अक्षरात सफाईदारपणे, बेमालूमपणे बदल करण्यात आला आहे. तो गडद करुन त्याच्या मागे निळ्या रंगाची नवलाई पेरण्यात आली आहे. या एफचा फाँट सध्या बदलण्यात आलेला नाही. तो तसाच Facebook Sans असा आहे. हा बदल इतका सफाईदारपणे करण्यात आला आहे की, तो डोळ्यांना अगदी आपलासा वाटतो. त्यात बदल झाल्याचे चटकन लक्षात येत नाही.