नवी दिल्ली : फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) लहान मुलांसाठी नवीन अॅप लाँच करणार आहेत. हे अॅप सध्याच्या इन्स्टाग्रामची एक नवीन आवृत्ती (व्हर्जन) असेल, विशेषत: 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी हे अॅप असेल. इन्स्टाग्राम प्रॉडक्टचे उपाध्यक्ष विशाल शाह यांनी BuzzFeed ला दिलेल्या मुलाखतीत याबाबतची माहिती दिली आहे. शाह यांच्या म्हणण्यानुसार, इंस्टाग्रामचे दोन व्हर्जन असतील. एक व्हर्जन 13 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी असेल. तर दुसरं व्हर्जन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी असेल. लहान मुलं या सेफ मोडमध्ये इन्स्टाग्रामचा वापर करु शकतील. (Facebook may soon launch Instagram for kids under the age of 13)
सध्याचे इंस्टाग्रामचे धोरण 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना इन्स्टाग्राम वापरण्याची परवानगी देत नाही. तसेच, मुलं त्यांचे पालक आणि व्यवस्थापकांच्या देखरेखीखाली इन्स्टाग्राम वापरू शकतात. BuzzFeed च्या अहवालानुसार, किड्स फोक्स्ड Instagram व्हर्जनचे काम Instagram चे प्रमुख Adam Mosseri पाहतील. त्याचे नेतृत्व फेसबुकचे उपाध्यक्ष Pavni Diwanji करणार आहेत, त्यांनीच यापूर्वी युट्यूब किड्सचे नेतृत्व केले होते. हे Google च्या सब्सिडियरीचे चाइल्ड फोकस्ड प्रोडक्ट आहे.
फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांवर वाढत्या गुन्ह्यांच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. या प्लॅटफॉर्मवर मुलांशी संबंधित आक्षेपार्ह पोस्ट असल्याचा आरोप आहे. यानंतर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेंट काढून टाकण्यासाठी दबाव वाढला होता. यूके आधारित नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रूएल्टी टू चिल्ड्रनच्या (National Society for the Prevention of Cruelty to Children) अहवालानुसार, इन्स्टाग्रामवर मुलांशी संबंधित सर्वाधिक केसेस आढळले आहेत. गेल्या तीन वर्षात यात लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी स्वतंत्र अॅप्स तयार करण्याचा दबाव वाढला आहे.
जर आपण फेसबुक ग्रुपवर (Facebook Group) काही शेअर करत असाल तर सावध रहा. कारण, फेसबुकने आता आपल्या ग्रुप्ससाठी हानिकारक कंन्टेन्ट ठेवण्याचे नियम जाहीर केले आहेत. फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, अशा ग्रुप्सला मर्यादित केलं जाईल जिथे धोकादायक माहिती पसरवली जात आहे.
जर ग्रुपने प्लॅटफॉर्मद्वारे तयार केलेले नियम मोडले तर फेसबुक अशा गटांवर बंदी घालेल. त्याच्या व्यासपीठावरील नियम वारंवार मोडणाऱ्या या गटाच्या सदस्यांवरही कंपनी कारवाई करेल. फेसबुकने ब्लॉग पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, यामुळे लोकांसाठी संभाव्य हानिकारक गट एकत्र करणे बंद होईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गटांवर मर्यादा आणल्या जाईल.
सध्या सोशल मीडियावर अनेक खोट्या आणि फसवणुकीच्या गोष्टी व्हायरल होत असतात. त्यावर निर्बंध आणण्यासाठी फेसबूक मोठ्या पातळीवर काम करत आहे. कारण, अशा माहितीमुळे यूजर्सचे मोठे नुकसान झाले आहे. हल्लीची तरुणाई यामुळे गुन्हेगारीतही वळली आहे. यामुळे यावर आता कठोर पाऊलं उचलण्याची गरज आहे.
यापूर्वी फेसबुकने एका निवेदनात म्हटले होते की, कोणत्याही गटात उल्लंघन पोस्ट करणार्या लोकांना पोस्ट करण्यापासून मर्यादित काळासाठी बंदी घालतील. ही मर्यादा 7 ते 30 दिवसांदरम्यान असू शकते. इतकंच नाही तर ग्रुपमध्ये नवीन सदस्य अॅड करू शकणार नाहीत किंवा फेसबुकवर नवीन ग्रुप तयार करु शकणार नाहीत
संबंधित बातम्या
Jio चा धमाकेदार प्लान! फक्त 3.86 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, वाचा काय आहे ऑफर
एअरटेलचे शानदार रिचार्ज प्लान, केवळ 300 रुपयात हाय स्पीड डेटासह विमा कवच
(Facebook may soon launch Instagram for kids under the age of 13)