अ‍ॅपल वॉचला टक्कर देणार फेसबुकचे स्मार्टवॉच, पुढील वर्षी स्मार्टवॉच बाजारात आणण्याची फेसबुकची योजना

| Updated on: Feb 13, 2021 | 2:28 PM

अ‍ॅपल वॉचला टक्कर देणार फेसबुकचे स्मार्टवॉच, पुढील वर्षी स्मार्टवॉच बाजारात आणण्याची फेसबुकची योजना (Facebook plans to launch a smartwatch next year)

अ‍ॅपल वॉचला टक्कर देणार फेसबुकचे स्मार्टवॉच, पुढील वर्षी स्मार्टवॉच बाजारात आणण्याची फेसबुकची योजना
फेसबुकचे स्मार्टवॉच येणार
Follow us on

नवी दिल्ली : फेसबुकची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. याच जोरावर बाजारात आपला दबदबा निर्माण करण्याकडे फेसबुकने लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या फेसबुककडून हटके स्वरुपाच्या स्मार्टवॉचवर काम केले जात आहे. हे स्मार्टवॉच युजर्सला मेसेज पाठवण्याबरोबरच हेल्थ आणि फिटनेस फिचर्स ऑफर करणार आहे. हे स्मार्टवॉच अ‍ॅपल आणि हुवावेला कडवी टक्कर देणार आहे. सध्या मार्केटमध्ये अ‍ॅपल आणिा हुवावेच्या वॉचची छाप आहे. फेसबुकने आपले स्मार्टवॉच पुढील वर्षीच बाजारात आणण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. (Facebook plans to launch a smartwatch next year)

कसे असेल फेसबुकचे स्मार्टवॉच?

फेसबुकचे स्मार्टवॉच सेल्युलर कनेक्शनवर काम करेल. हे स्मार्टवॉच युजर्सला मेसेज पाठवण्याबरोबरच इतर सेवा तसेच हेल्थ आणि फिटनेस कंपनीच्या अन्य हार्डवेअरशी कनेक्ट करण्याची संधी देणार आहे. यात पेलोटॉन इंटरअ‍ॅक्टिव आदींचा समावेश आहे. फेसबुकने अलिकडेच हार्डवेअर क्षेत्रात एण्ट्री केली आहे. यात व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी हेडसेट ओकुलस, व्हिडीओ चॅटिंग डिव्हाईस पोर्टलसह काही प्रोडक्ट्सचा समावेश आहे.

अ‍ॅण्ड्रॉईड बेस असेल स्मार्टवॉच

फेसबुकचे स्मार्टवॉच गुगल अ‍ॅण्ड्रॉईड सॉफ्टवेअरच्या ओपन सोर्स व्हर्जनवर काम करेल. कंपनी या वॉचच्या पहिल्या जनरेशनला 2022 मध्ये लॉन्च करू शकते, तर दुसरे जनरेशन 2023 मध्ये लॉन्च केले जाऊ शकते. याशिवाय फेसबुक आपली स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टमसुद्धा तयार करीत आहे. वॉचच्या किंमतीबाबत अजून काही माहिती पुढे आलेली नाही. कंपनी हे स्मार्टवॉच प्रोडक्शन कॉस्ट म्हणजेच उत्पादनाचा खर्चाइतकीच किंमत ठेवून विक्री करू शकते, असे बोलले जात आहे. या स्मार्टवॉचमध्ये युजर्स आपले वर्कआऊट मित्रासोबत शेअर करू शकतो, अशा प्रकारचे काही फिचर्स अ‍ॅड करण्याचीही फेसबुकची योजना आहे. यामुळे तुम्ही आपल्या ट्रेनरशी थेट संपर्क साधू शकता. हे फिचर स्ट्रेव्हा अ‍ॅपप्रमाणे असेल, जे रनर्स आणि सायकलिस्टला आपला वर्कआऊट ट्रॅक करण्याची व कंपेअर करण्याची संधी देते. फेसबुकडून लवकरच स्मार्टवॉचबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. (Facebook plans to launch a smartwatch next year)

 

 

संबंधित बातम्या

आता ऑनलाईनच होणार वाहन विमा नूतनीकरण, फेक विमा पॉलिसीला बसणार आळा

या मोबाईल अ‍ॅपद्वारे Post Office मध्ये उघडा खातं, घर बसल्या होईल काम