12 जीबी रॅम, तीन कॅमेरे, One Plus 7 Pro लाँच, किंमत तब्बल…

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

मुंबई : बहुप्रतिक्षित One Plus 7 आणि One Plus 7 Pro हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आले आहे. मंगळवारी (14 मे) रोजी वन प्लस कंपनीद्वारे बंगळूरमध्ये हा फोन लाँच केला. या फोनची किंमत 48 हजार 999 रुपये असणार आहे. या दोन्ही स्मार्टफोनचे अनेक स्पेसिफिकेशन उघड या कार्यक्रमात उघड करण्यात आले. विशेष म्हणजे दोन फोनसह […]

12 जीबी रॅम, तीन कॅमेरे, One Plus 7 Pro लाँच, किंमत तब्बल...
Follow us on

मुंबई : बहुप्रतिक्षित One Plus 7 आणि One Plus 7 Pro हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आले आहे. मंगळवारी (14 मे) रोजी वन प्लस कंपनीद्वारे बंगळूरमध्ये हा फोन लाँच केला. या फोनची किंमत 48 हजार 999 रुपये असणार आहे. या दोन्ही स्मार्टफोनचे अनेक स्पेसिफिकेशन उघड या कार्यक्रमात उघड करण्यात आले. विशेष म्हणजे दोन फोनसह कंपनीने वायरलेस हेडफोनही लाँच केले आहेत.

One Plus 7 Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले – 19:5:9 Ratio सोबत 6.67 इंच कर्व्ड QHD+(3120 X 1440 पिक्सल) Fluid AMOLED डिस्प्ले,  90Hz रिफ्रेश रेट

प्रोसेसर –  7nm प्रोसेसरसह 2.84Ghz च्या स्पीडचा ऑक्टा कोअर क्वॉलकॉम स्नैपड्रैगन 855 प्रोसेसर

जीपीयू- Adreno 640

रॅम – 6GB, 8GB आणि 12GB

स्टोअरेज-  128GB/256GB UFS 3.02-LANE

ऑपरेटिंग सिस्टम – Android 9 Pie Based OxygenOS

त्याशिवाय या फोनमध्ये तीन कॅमेरा देण्यात आला आहे. यात प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल, दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सल आणि तिसरा कॅमेरा 16 मिगापिक्सलचा आहे. यात LED फॅल्श, 3X ऑप्टिकल झूम, मल्टी ऑटोफोकस हे फिचर्सही देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे सेल्फीसाठी पॉप अप कॅमेरा देण्यात आला आहे. One Plus 7 Pro या स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सल आहे.

त्याशिवाय व्हीडिओ काढण्यासाठी यात सुपर स्लो मोशन आणि टाईम लॅप्स हे दोन नवीन स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत.

या स्मार्टफोनमध्ये 4000mAh बॅटरी बॅकअप देण्यात आली आहे.

One Plus 7 Pro हा स्मार्टफोन मिरर ग्रे, नेबुला ब्लू आणि ऑलमंड या तीन रंगात उपलब्ध असणार आहे.

One Plus 7 Pro फोनची किंमत 

One Plus 7 Pro या स्मार्टफोनमधील  (6 GB/128GB) हा फोन 17 मे पासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. याची किंमत 48 हजार 999 रुपये आहे. तर  8 GB/256GB आणि 12 GB/256 GB या दोन्ही वेरियंट 28 मे पासून ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. यातील  8 GB/256GB या फोनची किंमत 52 हजार 999 तर 12 GB/256 GB  या फोनची किंमत 57 हजार 999 रुपये आहे.

याशिवाय One Plus 7 या फोनमध्ये दोन वेरियंट उपलब्ध आहेत. हे दोन्ही फोन जून महिन्यात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. यातील 6 GB/128GB 32 हजार 999 रुपये आणि 8 GB/256 GB  वेरियंटची किंमत 37 हजार 999 रुपये आहे.

पाहा व्हिडीओ :