नवी दिल्ली : भारतातील लाखो मोबाईल गेमर पबजी मोबाईल इंडियाच्या प्रतिक्षेत आहेत. पबजी मोबाईल भारतात जरी बॅन असला तरी जगभरात या गेमची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. पबजीबाबत आलेल्या अहवालांनुसार पबजी कॉर्पोरेशन मार्च 2021 पर्यंत पबजी मोबाईल इंडियाला भारतात पुन्हा लाँच करण्याच्या विचारात आहे. मात्र याबाबत पबजी कॉर्पोरेशनकडून अद्याप दुजोरा देण्यात आला नाही. जगभरातील पबजी प्रेमी मोबाईल लाईट 2020.1 वर पबजी खेळू शकतात आणि डाऊनलोड करु शकतात. विशेषतः हा गेम लो-एंड फोन असलेल्या खेळाडूंसाठी डिझाईन केला आहे. पबजी मोबाईल लाईटचा गेमप्ले पबजी मोबाईलसारखे आहे परंतु या गेममध्ये काही मोठे बदल आहेत. ज्यामध्ये सामन्यात खेळाडूंची संख्या कमी, नकाशा आणि लॉबीचा आकार कमी आहे. ज्यांच्याकडे आधीपासूनच स्मार्टफोनमध्ये पबजी मोबाईल लाईट 0.20.0 व्हर्जन आहे ते 0.20.1 अपडेट इन-गेम डाउनलोड करू शकतात. (Find out when PUBG will be launched in India)
जर तुम्ही जुने व्हर्जन डाऊनलोड केले नसेल तर तुम्हाला 0.20.1 अपडेट प्राप्त करण्याआधी जुने व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल. गेमची APK फाईलचा उपयोग करुन PUBG मोबाईल लाईट 0.20.1 ग्लोबल व्हर्जन डाऊनलोड आणि इंस्टॉल करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करु शकता.
डाऊनलोड सुरू करण्यासाठी एपीके डाऊनलोड बटनवर टॅप करा. या एपीके फाईलची साईज 575 एमबी आहे. डाऊनलोड पूर्ण झाल्यानंतर एपीके फायलवर क्लिक करुन गेम इंस्टॉल करण्यासाठी सक्षम असेल. त्यानंतर तुम्ही पबजी मोबाईल लाईट उघडू शकता. इन-गेम पॅच पूर्ण झाल्यानंतर, आपण गेमची नवीनतम आवृत्ती खेळण्याचा आनंद घेऊ शकता.
भारत सरकारने 2 सप्टेंबर 2020 मध्ये पबजीवर बंदी घातली होती. देशात गुगल प्ले स्टोर आणि अॅपल प्ले स्टोरमधून हा गेम हटवण्यासाठी गुगल आणि अॅपलला आदेश देण्यात आले होते. केंद्र सरकारने गोपनीयतेच्या चिंतेमुळे पबजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पबजी कॉर्पोरेशनने दोन प्रमुख घोषणा केल्या होत्या, त्यानंतर हा गेम भारतात परत येण्याची अपेक्षा होती. याची मूळ कंपनी क्राफ्टन इंकने अलिकडेच अनिश अरविंद यांना भारताचे व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले आहे आणि पबजी मोबाईल इंडिया भारतात लवकरच लाँच करु शकत असल्याचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याशिवाय काही मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, क्राफ्टन इंकने पबजी मोबाईल इंडियाच्या लाँचसाठी आणखी चार जणांची नेमणूक केली आहे. (Find out when PUBG will be launched in India)
#IPLAuction2021 | Glenn Maxwell is sold to Royal Challengers Bangalore for Rs 14.25 Crores: Indian Premier League
(file photo) pic.twitter.com/YT9RwixgqY
— ANI (@ANI) February 18, 2021
इतर बातम्या
पुढील आठवड्यात लाँच होणार रिअलमीचे दोन स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास?
पेट्रोल वाचवण्यासाठी 4 खास टिप्स; महागडे असूनही रेकॉर्ड पैशांची बचत!