सणासुदीच्या मुहूर्तावर ‘हे’ पाच किफायतशीर स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमती आणि फिचर्स
सणासुदीच्या मुहूर्तावर विविध मोबाईल कंपन्यांनी अनेक किफायतशीर स्मार्टफोन लाँच केले आहेत.
-
-
Gionee F8 Neo : भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन जियोनी एफ 8 नियो लाँच केला आहे. या बजेट स्मार्टफोनची किंमत फक्त 5499 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोमध्ये 5.45 इंचांचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत 3000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या फोनमध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सलचा आहे, तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरादेखील (सेल्फी कॅमेरा) आहे. या फोमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. हा फोन 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेजसह (इंटर्नल मेमरी) लाँच करण्यात आला आहे. याची मेमरी माइक्रो एसडी कार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवता येईल.
-
-
Oppo A15 : चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोने (Oppo) गुरुवारी भारतीय बाजारात त्यांचा नवीन स्मार्टफोन Oppo A15 (ओप्पो ए15) लाँच केला. या फोनमध्ये एआय ट्रिपल कॅमेरा आहे. भारतीय बाजारात या फोनची किंमत 10,990 रुपये आहे. या स्मार्टफोमध्ये 6.53 इंचांचा डिस्प्ले असून देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सलचा असून सोबत दोन मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. या फोनचा सेल्फी कॅमेरा (सेकंडरी कॅमेरा) 5 मेगापिक्सल्सचा आहे. या फोनमध्ये पी 35 ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. तसेच 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल मेमरी (स्टोरेज) आहे.
-
-
Samsung Galaxy M31 Prime : सॅमसंग इंडियाने सॅमसंग गॅलेक्सी एम31 प्राईम (Samsung Galaxy M31 Prime) हा फोन लाँच केला. या फोनमध्ये 6000 एमएएच इतकी पॉवरफुल्ल बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 16,499 रुपये इतकी आहे. यामध्ये 6.4 इंचांचा इनफिनिटी यू AMOLED डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज दिला आहे. सोबत सॅमसंग Exynos 9611 प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियर कॅमेऱ्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 5 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्लसलचा कॅमेरा दिला आहे.
-
-
HTC Desire 20+ : तैवानची स्मार्टफोन कंपनी HTC ने तैवानमध्ये HTC Desire 20+ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप, नॉच्ड सेल्फी कॅमेरा आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. यासोबतच 6GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेजसह (इंटर्नल मेमरी) हा फोन लाँच करण्यात आला आहे. कंपनीने HTC Desire 20+ हा स्मार्टफोन डॉन ऑरेंज आणि ट्वाइलाइट ब्लॅक या दोन रंगांच्या व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 8490 न्यू तैवान डॉलर (जवळजवळ 21,700 रुपये) इतकी आहे.
-
-
Samsung Galaxy S20 FE : दक्षिण कोरियाई टेक कंपनी सॅमसंगने नुकताच त्यांचा सॅमसंग गॅलेक्सी एस 20 फॅन एडिशन (Samsung Galaxy S20 FE ) हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) सुपर एमोलेड इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे, तसेच डिस्प्ले वर कॉर्निंग गोरिला ग्लास 3 ची सुरक्षा आहे. Galaxy S20 FE च्या 4 जी वेरिएंटमध्ये ऑक्टा-कोर Exynos 990 चिपसेट आहे. फोनच्या 5 जी ऑप्शन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट आहे. डिव्हाइसमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे.