मुंबई : फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटच्या ‘बिग शॉपिंग डेज’ (Flipkart Big Shopping Days) सेलला लवकरच सुरुवात होणार आहे. येत्या 15 मेपासून या सेलची सुरुवात होणार आहे. हा सेल चार दिवस असणार आहे. या सेलमध्ये अनेक वस्तुंवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सही तुम्हाला अगदी माफक दरात मिळणार आहेत. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मोठी सूट देण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरु शकते.
Flipkart Big Shopping Days दरम्यान Apple, Samsung, Xiaomi, Vivo, Oppo, Asus यांसारख्या मोबाईल कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळणार आहे. या स्मार्टफोन्सवर फ्लॅट डिस्काउंटसोबतच अॅडिशनल डिस्काउंटही असणार आहे. जर तुमच्याजवळ एचडीएफसीचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 10 टक्के जास्त सूट मिळू शकते.
या सेलपूर्वी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने काही स्मार्टफोन्सवरील डिस्काउंट जाहीर केले आहेत. सेलपूर्वी कंपनीने एक डेडिकेटेड लँडिंग पेज तयार केलं आहे. या पेजवर स्मार्टफोन्सवरील ऑफर्सची माहिती देण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त, Redmi 6, Vivo Y81, Redmi Y2, Asus Max Pro M2 आणि Lenovo या स्मार्टफोन्सवरही मोठी सूट मिळणार आहे.