नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये (West Bangal) मोबाईल गेम (Mobile Game) खेळताना हरल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वृत्तानुसार ही घटना पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील पोटाशपूर गावातील आहे. येथे एका अल्पवयीन मुलाला मोबाईल (Mobile) गेममध्ये हरल्याबद्दल चपलाने 200 वेळा मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर मुलाची अवस्था अशी झाली की त्याला मेदिनीपूर मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना बुधवार, 17 ऑगस्टला घडली. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील पोटाशपूर गावापासून काही अंतरावर असलेल्या एका दुर्गम ठिकाणी काही अल्पवयीन मुले मोबाईलवर गेम खेळत होती. या गेममध्ये पराभूत झालेल्याला शूजने मारण्याची अट होती. यामध्ये हरल्यानंतर अल्पवयीन मुलाला चपलानं 200 जोडे मारण्यात आले. अल्पवयीन घरी परतल्यावर त्याची प्रकृती बिघडली आणि नाकातून रक्त येऊ लागले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी अल्पवयीन मुलाला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. तेथून त्यांना नंतर मेदिनीपूर मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले.
बुटाने मारहाण केल्याची स्थिती कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिक पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर अल्पवयीन मुलालाही पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली. मात्र, हे अल्पवयीन मुले कोणता खेळ खेळत होते, याचे नाव अद्याप उघड झालेले नाही. पोलिसांनीही यावर भाष्य केलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की ऑनलाइन व्हिडिओ गेमिंगचा बाजार खूप वेगाने वाढत आहे, त्यासोबतच त्याचे दुष्परिणामही वाढत आहेत. अनेक व्हिडीओ गेम्स लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. ब्लू व्हेलसारख्या गेममुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. अशा व्हिडीओ गेम्सचा मुलांवर नकारात्मक परिणाम होत असून, ते हिंसक बनत आहेत आणि जीवे मारण्यासही प्रवृत्त होत आहेत.