स्मार्टफोनच्या बाजारातील महत्वपूर्ण ब्रँड असलेला वनप्लस हा त्यांचा नवा स्मार्टफोन (Smart Phone) वनप्लस 10टी 5जी, 3 ऑगस्टला (3rd August) बाजारात लॉँच करणार आहे. मात्र त्यापूर्वीच या फोनचे फीचर्स आणि इतर तपशील (Features of Smartphone) लीक झाले आहेत. चीनमध्ये हा फोन यह वनप्लस एस प्रो नावाने तर जागतिक बाजारात या स्मार्टफोनचे नाव 10टी असेल. चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनीने लॉंचिगपूर्वीच स्मार्टफोनची माहिती शेअर करण्यास सुरूवात केली आहे. या फोनमध्ये हेजेलब्लाड कॅमेरा सेटअप किंवा साईड बेजेल वर अलर्ट स्लायटरची सुविधा नसेल. वनप्लसच्या या लवकरच येणाऱ्या ‘वनप्लस 10टी’ या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉक चे फ्लॅगशिप प्रोसेसर सुपरड्रॅगन 8 जेन 1 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. त्यासह बॅक पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअपही आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
प्राइस बाबाने टिप्सटर इशान अगरवाल याच्यासह वनप्लस 10टी 5जी च्या स्पेसिफिकेशनचा खुलासा केला आहे. वनप्लसच्या या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा प्लूइड एमोलेड डिस्प्ले आहे. त्यामध्ये 2,412×1,080 पिक्सल रेझोल्यूशन, 10 बिट कलर्स एसआरजीबी कलर गेमट आणि एचडीआर 10 प्लसचा सपोर्ट देण्यात आला आहे. ज्यामुळे उत्तम Viewing Experience मिळतो.
वनप्लस 10टी 5जी च्या कॅमेरा विभागाबद्दल सांगायचे झाले तर, त्यामध्ये बॅक पॅनेलवर 50 मेगापिक्सेचलचा सोनी आयएमएक्स सेन्सर पहायला मिळेल. त्यासह ओआयएस सपोर्टही आहे. यामध्ये 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड ॲंगल लेन्स असून त्यामुळे 120 डिग्री फील्ड व्ह्यू कॅप्चर होतो. तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही उपलब्ध आहे.
वनप्लस 10टी 5जी फोनमधील रॅम व स्टोरेज बद्दल आत्तापर्यंत दोन गोष्टी समोर आल्या आहेत. टॉप व्हेरियंटमध्ये 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळू शकेल. तर दुसऱ्या लीकनुसार, फोनमध्ये 16 जीबीपर्यंत रॅम आणि 512 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळू शकेल.
वनप्लस 10टी 5जी मोबाइलची सुरूवातीची किंमत 49,999 रुपये असेल असे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये बेस व्हेरियंट असेल. या किमतीत 8 जीबी रॅम व 128 जीबी इंटर्नल स्टोरेज असेल. तर टॉप व्हेरियंटची किंमत 66,999 रुपये असेल.