Gaming Smartphones Under 20000: जर तुम्ही गेमिंगसाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय तसेच एखाद्या गेमर्सना एक भन्नाट गेमिंग फोन खरेदी करायचा आहे पण त्यात तुमचे बजेट 20,000 रुपयांपेक्षा जास्त नसेल तर तुम्ही काळजी करू नका, कारण बाजारात असे अनेक उत्तम गेमिंग स्मार्टफोन आहेत ज्यांची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी आहे. हे फोन तुम्हला एक चांगल्या चिपसेट, मोठी बॅटरी आणि उत्कृष्ट स्क्रीन प्रदान करतात, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमचे आवडते गेम खेळू शकता. यामध्ये मोटोरोला, सॅमसंग, iQOO, नथिंग आणि रेडमी सारखे ब्रँड 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उत्तम गेमिंग स्मार्टफोन विकत आहेत, येथे तुम्ही 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्तम गेमिंग फोनची यादी पाहू शकता.
Moto Edge 50 Neo: मोटो एज 50 निओ हा स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्टवर 21,999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच बँक कार्ड डिस्काउंटसह 19,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी 7300 चिपसेटसपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि १० मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आहे.
Samsung Galaxy A15 5G: सॅमसंग गॅलेक्सी ए १५ ५ जी हा स्मार्टफोन देखील तुमच्यासाठी २०,००० रुपयांच्या बजेटमध्ये एक चांगला पर्याय असू शकतो. ॲमेझॉनवर याची किंमत 14,998 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ६१००+ चिपसेट असलेला फोन गेमिंगचा गेमर्सना चांगला अनुभव देऊ शकतो. यात 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे.
iQOO Z9: आयकू झेड 9 हा स्मार्टफोन ॲमेझॉनवर 18,498 रुपयांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी 7200 चिपसेटला समर्थन देते, जे TSMC दुसऱ्या पिढीच्या 4nm प्रक्रियेचा वापर करून 2.8 GHzच्या क्लॉक स्पिडसारखं तयार केले गेले आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony IMX882 OIS मध्ये कॅमेरा देण्यात आले असून जो 4के व्हिडिओ रेकॉर्डिंग, सुपर नाईट मोड, 2 एक्स पोर्ट्रेट झूम आणि द्रुत फोटो आणि व्हिडिओसाठी 50 एमपी यूएचडी मोड सपोर्ट करतो.
Nothing Phone 2a: नोथिंग 2 ए हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 23,999 रुपयांना उपलब्ध केला आहे. तुम्हाला 3,000 रुपयांच्या बँक कार्ड डिस्काउंटसह 20,999 रुपयांमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. यात मीडियाटेक डायमेंसिटी ७२०० प्रो चिपसेट देण्यात आला आहे. यात ६.७ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, यात 5000 एमएएच बॅटरी आहे जी दिवसभर वापरासाठी योग्य आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह ५० मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आणि सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.
Redmi Note 13 Pro: ॲमेझॉनवर रेडमी नोट 13 प्रोची किंमत 18,250 रुपये आहे. रेडमी नोट 13 प्रो हा स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 चिपसेटवर चालतो. यात 1.5 के 6.67 इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शनसोबत येतो.
तुम्ही सुद्धा नवीन वर्षाच्या सुरुवातील चांगल्या आणि गेमिंगसाठी स्मार्टफोन विकत घेणार असाल तर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या साईटवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता.