मुंबई : स्मार्टफोन निर्माती कंपनी जियोनीने (Gionee) सोमवारी त्यांचा नवा बजेट स्मार्टफोन ‘जियोनी मॅक्स प्रो’ (Gionee Max Pro) 6,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात सादर केला आहे. जेआयपीएलचे एमडी, प्रदीप जैन, जे भारतातील जियोनीचे व्यवस्थापन करतात, त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनी परवडणाऱ्या किंमतीत उत्पादनांची निर्मिती करण्याचा विचार करत आहे. यामध्ये जियोनीच्या एंट्री लेव्हल स्मार्टफोनचाही समावेश आहे. ते म्हणाले की, आम्हाला विश्वास आहे की आमचा जियोनी मॅक्स प्रो आजच्या पिढीच्या डिजिटल गरजा भागवेल. (Gionee Max Pro with 6000 mAh battery available in india price and specification)
तथापि, जियोनीच्या फुल व्ह्यू ड्रॉप डिस्प्ले की ने सुसज्ज अशा या बजेट स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाची एचडी स्क्रीन आहे. या सुपर स्मार्ट फोनमध्ये 3 जीबी रॅम, 32 जीबी रॉम (इंटर्नल स्टोरेज स्पेस) आहे, जो 256 जीबीपर्यंत वाढवता येतो. जियोनी मॅक्स प्रो (Gionee Max Pro) मध्येदेखील दीर्घकाळ टिकणारी 6000 एमएएच बॅटरी आहे. युजर्ससाठी, यामध्ये 60 तासांचा कॉलिंग, 34 दिवसांचा स्टँडबाय, 115 तास संगीत, 12 तास गेमिंग आणि 13 तासांचा बिंग मूव्ही पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे. सोबतच इतरही अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
या स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक, गुगल असिस्टंटसारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन ब्लॅक, रेड आणि ब्लू या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. यासह जियोनी मॅक्स प्रोचे ग्राहक फ्लिपकार्टवरुन 2,499 रुपयांच्या सवलतीत नवीन गुगल नेस्ट मिनी स्मार्ट स्पीकर खरेदी करू शकतात.
या फोनमध्ये 13 एमपी प्लस 2 एमपी (मेगा पिक्सेल) डुअल रियर कॅमेरा आणि 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. जियोनीने असा दावा केला आहे की मागील बाजूस ड्युअल-कॅमेरा सेटअप ऑटो एचडीआर, बोकेह इफेक्ट, स्लो-मोशन मोड आणि पनामा मोडला सपोर्ट करतो. रियर कॅमेर्याद्वारे समर्थित 30fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाऊ शकतात. या कॅमेर्यामध्ये पोर्ट्रेट मोड आणि एचडीआर सारखी वैशिष्ट्ये आहेत.
जियोनी मॅक्स प्रो मध्ये 2.5 डी कर्व्ड ग्लास प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन सध्या अँड्रॉइड 10 वर चालतो. फोनसाठी अँड्रॉइड 11 सॉफ्टवेअर लवकरच रोलाऊट केलं जाऊ शकतं, परंतु कंपनीने याविषयीची कोणतीही अथिकृत माहिती जाहीर केलेली नाही. जियोनी मॅक्स प्रो 1.6GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. फोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज, तसेच डेडिकेटेड स्लॉटवर 256 जीबी मायक्रोएसडी सपोर्ट आहे. फोन एलटीई नेटवर्कला सपोर्ट करतो.
Now you can stay connected all time and explore endless virtual possibilities with unmatched 34 days standby, 115hrs of music, 60hrs of calling, 13hrs of binge watch and 12hrs of gaming!
Excited enough? Launched on 1st March 2021 on Flipkart.
Check now: https://t.co/cUKi2p145R pic.twitter.com/gaU9ubPJXn— Gionee India (@GioneeIndia) March 1, 2021
इतर बातम्या
Moto E7 Power Review : मोटोरोलाचा नवा बजेट फोन भारतात लाँच, जाणून घ्या स्मार्टफोनबाबत सर्व माहिती
OPPO F19 Pro, F19 Pro+5G स्मार्टफोन्सचे फीचर्स लीक, जानून घ्या काय असेल खास
ना Apple, ना Xiaomi, OnePlus, वर्षभरात या मोबाईलची सर्वाधिक विक्री
(Gionee Max Pro with 6000 mAh battery available in india price and specification)