तुमचे Gmail फुल्ल झालंय का? मग ‘ही’ युक्ती एकदा वापरुन बघाचं

| Updated on: Nov 24, 2024 | 3:58 PM

जीमेल अकाउंट चालवणारे लोक जीमेल स्टोरेज भरले आहे. आता काय करायचे? आता गुगलला स्टोरेज साठी पैसे द्यावे लागतील का? अशी चिंता करत असतात. पण पैसे न देता जीमेल मोफत रिकामे करता येऊ शकते. कसे करायचे ते जाणून घेऊ.

तुमचे Gmail फुल्ल झालंय का? मग ही युक्ती एकदा वापरुन बघाचं
Follow us on

कोट्यावधी लोक ईमेल पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी जीमेल वापरतात. परंतु काही वेळा लोकांना जीमेल स्टोरेज भरण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. ही एक अशी समस्या बनली आहे की प्रत्येक व्यक्ती याच्याशी संघर्ष करत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकजण फक्त या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे. पैसे खर्च न करता जीमेल मध्ये स्पेस कसा तयार करायचा हे शोधत आहे.

जीमेल स्टोरेज मर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास वापरकर्त्यांना जीमेल, फोटोज, ड्राईव्ह आणि इतर सेवांमध्ये डेटा वाचवण्यासाठी 15 gb मोफत स्टोरेज दिले जाते. तुम्ही तुमच्या जीमेल स्टोरेज काही सोप्या मार्गांनी रिकामे करू शकता.

जीमेल कसे रिकामे करायचे?

तुम्हाला आवश्यक नसलेले जुने वृत्तपत्रे, जाहिराती, जुने चॅटिंग यासारखे ईमेल डिलीट करा.

ईमेल सोबत जोडलेले अटॅचमेंट जास्त जागा घेतात. तुम्ही सर्च बार मध्ये “has:attachment larger:10M” टाईप करून 10MB पेक्षा मोठ्या अटॅचमेंट शोधून त्या डिलीट करू शकता.

जीमेल ची स्टोरेज भरण्याची शक्यता दूर करण्यासाठी स्पॅम आणि ट्रैश फोल्डर नियमितपणे रिकामे करत रहा.

बराच वेळा काही ईमेल असे प्राप्त होतात जे आता नको आहेत. अशा परिस्थितीत ई-मेल उघडा आणि ई-मेल मध्ये दिसणाऱ्या अन सबस्क्राईब पर्यायावर क्लिक करा असे केल्याने तुम्हाला पुढील वेळी ते ईमेल पुन्हा येणार होणार नाही.

Google Drive आणि Photos मध्ये शोधा या गोष्टी

Google Drive आणि Photos मध्ये मोठ्या फाईल शोधून त्या डिलीट करा किंवा त्यांना कमी जागा लागणाऱ्या फॉर्मेटमध्ये कन्व्हर्ट करा.

काही वेळा काही फाईल्स आणि फोटो डुप्लिकेट फाइल्स बनतात. जे स्टोरेज जास्त घेतात. अशावेळी असे फोटो शोधून डिलीट करा.

लक्षात ठेवा

कोणताही ईमेल डिलीट करण्याच्या आधी तुम्ही शंभर वेळा विचार करा. कारण एकदा डिलीट झालेला ई-मेल पुन्हा परत मिळवणे अवघड असे. ही पद्धत वापरून तुम्ही जीमेलचे स्टोरेज सहज रिकामे करू शकता.