नवी दिल्ली | 25 February 2024 : आपल्या मनात शंका असेल, काही प्रश्नाची उत्तरे शोधायची असतील, काही माहिती मिळवायची असेल तर आपण थेट गुगलवर सर्च करतो. गुगल करण्याची ही पद्धत आता आपल्या चांगलीच अंगवळणी पडली आहे. तुम्ही कंम्प्युटर, लॅपटॉप अथवा मोबाईलचा वापर करत असाल तर गुगल क्रोम बाऊझरचा वापर करतो. पण ब्राऊझर किती सुरक्षित आहे? कारण आता याविषयी केंद्र सरकारने युझर्सला अलर्ट दिला आहे.
आढळल्या त्रुटी
केंद्र सरकारची सायबर सिक्युरिटी एजन्सी कम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमने याविषयी युझर्सला अलर्ट केले आहे. या ब्राऊझरमध्ये काही त्रुटी आहेत. त्याचा हॅकर्स फायदा घेत असल्याचे समोर आले आहे. युझर्सचा खासगी डेटा चोरुन त्याआधारे फसवणूक होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. सायबर गुन्हेगार तुमच्या खासगी माहिती आधारे सिस्टिम हॅक करु शकता. त्यामुळे गुगल क्रोम ब्राऊझर वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे.
हे व्हर्जन धोकादायक
कम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमने याविषयीची सूचना दिली आहे. त्यानुसार, गुगल क्रोममध्ये अशा काही त्रुटी आढळल्या आहेत, ज्याच्या मदतीने गुन्हेगार आणि हँकर्सला मदत होऊ शकते. या त्रुटीच्या माध्यमातून हॅकर्स तुमचे कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल सहज एसेस मिळवू शकता. ते हॅक करु शकतात. क्रोमचे v122.0.6261.57 वा त्यापेक्षा जुने व्हर्जन सर्वाधिक धोकादायक आहे.
ALERT📷
CERT-In, Government of India has reported multiple vulnerabilities in Google Chrome that could allow a remote attacker to execute arbitrary code on the targeted system.
Learn more at https://t.co/yJsYgPjHXm#cybersecurity #DigitalIndia #Chrome pic.twitter.com/kVWyNDFyyf— CeGMeitY (@MeitYCeG) February 23, 2024
गुगल पण लागले की कामाला
केंद्र सरकारच्या या इशाऱ्यानंतर गुगल पण कामाला लागले आहे. क्रोमसंबंधी सुरक्षेत सुधारणेसाठी कंपनीने प्रयत्न सुरु केले आहेत. क्रोमच्या ब्राऊझिंगवेळी ज्या त्रुटी समोर आणल्या. त्यावर काम सुरु आहे. गुगलने युझर्सला सांगितले आहे की, सायबर धोक्यापासून वाचण्यासाठी युझर्संनी गुगलचे ब्राऊझर अपडेट करणे गरजेचे आहे. नवीन व्हर्जन इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.
असे करा ब्राऊझर अपडेट