Google Discover आणि गुगल न्यूजची सेवा डाऊन, यूजर्सचा सोशल मिडीयावर तक्रारींचा पाऊस

| Updated on: May 31, 2024 | 7:37 PM

फेसबुक आणि इंस्टाग्राम जसे काही दिवसांपूर्वी डाऊन झाल्याने जगभरातील युजर्सना अडचणीचा सामना करावा लागला होता. तसेच आता गुगलची गुगल न्यूज आणि गुगल डिस्कव्हर सेवा डाऊन झाली आहे.

Google Discover आणि गुगल न्यूजची सेवा डाऊन, यूजर्सचा सोशल मिडीयावर तक्रारींचा पाऊस
Google Discover And Google News Service Down
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

गुगलची न्यूज सर्व्हीस प्लॅटफॉर्म गुगल न्यूज डाऊन झाली आहे. या सेवेचा वापर करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेब व्हर्जनसह गुगुल न्यूजच्या ए़ड्रॉईड आणि आयओएस एपवर देखील लेटेस्ट न्यूज फीड लोड होत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. स्क्रीनवर ही सेवा वापरताना समथिंग वेंट रॉंगचा एरर दाखवित आहे. टॉम गाईडच्या रिपोर्टनूसार जगभरातील या सेवेच्या युजर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एड्रॉईड युजर्सना गुगलच्या न्यूज एपमध्ये लेटेस्ट न्यूजची फिड लोड होत नसल्याच्या तक्रारी युजर्सनी सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत. गुगलची ही सेवा गेल्या अनेक मिनिटांपासून डाऊन आहे. गुगल न्यूज वापरणाऱ्यांना स्क्रीनवर बातम्या ऐवजी एरर दिसत आहे. तसेच आयओएस वापरणाऱ्यांनाही या एररचा सामना करावा लागत आहेत, सोशल मिडीयावर युजर्स स्क्रीन शेअर करुन या तक्रारी मांडल्या आहेत.

गुगल डिस्कव्हर देखील डाऊन

गुगल न्यूज सेवे प्रमाणे गुगल डिस्कव्हर देखील डाऊन झाले आहे. या सेवेचा वापर करताना युजर्सना न्यूज फिडमध्ये मिळत नाहीए..काही युजर्सनी तक्रार केली आहे की त्यांच्या गुगल डिस्कव्हरवर दोन दिवसांच्या जुन्या बातम्या दिसत आहेत. तर काही युजर्सना पेजवर एरर दाखवित आहे.

गुगलची ट्रेंड्स दाखविणारी सेवा देखील डाऊन आहेय. यात रियल टाईम सर्च ट्रेंड्ससाठी फिड लोड होत नसल्याचे उघड झाले आहे. तसेच कुठल्या खास कॅटगरीसाठी फिड लोड होत नाहीए…

गुगलकडून प्रतिक्रिया नाही –

गुगलची गुगल न्यूज आणि गुगल डिस्कव्हर सेवा डाऊन झाल्याबद्दल कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. ही बातमी लिहीपर्यंत तरी गुगलची सेवा सुरळीत झालेली नाही..

गुगल न्यूज काय आहे ?

गुगल न्यूज सेवाही गुगलच्या प्रमुख सेवेपैकी एक सेवा आहे. या सेवेत युजर्सना विविध पब्लिकेशनच्या सध्याच्या इव्हेंटची माहीती, जगभरातील बातम्या, घटना त्यांची छायाचित्रे शोधता येऊ शकतात. या सेवेत लेखांना आणि बातम्यांना बुकमार्क देखील केले जाऊ शकते. आपल्या सेक्शनमध्ये आपल्या आवडीनुसार बातम्या निवडण्याची आणि दिसण्याची सोय आहे.

गुगल डिस्कव्हर म्हणजे काय ?

गुगल डिस्कव्हर म्हणजे युजर्स आवडीनिवडीनूसार ही सेवा तयार होते. यात युजर्सना त्यांच्या सर्च आणि आवडीनूसार न्यूज आणि लेख दिसतात. यातील बातम्या आणि लेख वेळोवेळी अपडेट होत असते. आता या बातम्या जुन्याच दाखविल्या जात असल्याने ही सेवा डाऊन झाली आहे.