आजच्या घडीला प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत. त्यामुळे फोटो, व्हिडीओ तसेच कामाच्या मोठ्या फाईल्स स्टोअर करणे अगदी सामान्य झालं आहे. मात्र यासगळ्यात फोनमध्ये स्टोरेजची समस्या येताच अनेक जण फोन बदलण्याचा किंवा स्टोरेज खरेदी करण्याचा निर्णय घेतात. पण यात तुम्ही जर फ़ोनचे स्टोरेज फुल्ल झाल्याने फोन बदलण्याचा निर्णय घेत असाल तर तो चुकीचा आहे, कारण स्टोरेज खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या फोनमध्ये काही सेटिंग्ज बदल्या पाहिजेत. यामुळे तुमच्या फोनमध्ये बरीच स्पेस तयार होऊ शकते आणि तुम्हाला नवीन फोटो आणि व्हिडिओसाठी जागा मिळते. यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाही, फक्त गरज नसलेला तुमच्या फोनमधील डेटा डिलीट करा, गुगल ड्राइव्हमधील स्टोरेज साफ करा.
जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर यात फ्री अप स्पेसचा फीचर ऑप्शन मिळतो. फोनची स्टोरेज फुल झाल्यावर सर्वप्रथम फ्री अप स्पेसमध्ये जाऊन स्टोरेज तयार करावे. इथे तुम्हाला न वापरलेले ॲप्स दाखवले जातील, हे न वापरले जाणारे ॲप फक्त फोनची स्टोरेज फुल्ल करताय. यासाठी हे ॲप्स डिलीट करा.
तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ओपन स्टोरेज इथे जा. यात तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीत दाखवल्या जाणाऱ्या नको असलेल्या फाइल्स, गाणी, व्हिडिओ आहेत त्या डिलीट करा. जे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर टाकता ते तुम्ही तुमच्या फोनच्या व्हिडीओ ॲप मधून शोधून घेऊ शकता. कारण यातील व्हिडीओ नेहमीच तुमच्या सोशल मीडियावर सेव्ह केले जातात.
याशिवाय डुप्लिकेट फाईल्स चेक करा आणि डिलिटही करा. एकदा तुमच्या फोनमधील डिलीट विभागात किंवा डब्यात जा आणि तिथे तुम्ही आता डिलीट केलेले सगळे फोटोस व्हिडीओ मोठ्या फाईल्स डिलीट करून स्टोरेज रिकामे करा.