सध्याच्या घडीला अशी कोणतीही गोष्ट नाही, की जी गुगला माहीत नाही. जवळपास सगळ्याच गोष्टी गुगलला (Google) ठाऊक आहेत. अशातच आता गुगल संदर्भातच एक महत्त्वाची अपडेट आली आहे. सगळ्याच मोठं सर्च इंजिन (Search Engine) असलेल्या गुगलला तुम्ही तुमची खासगी माहिती काढण्यासही सांगू शकतो. कुणाच्या खासगी माहितीचा (Private information on Google) गैर वापर होऊन नये यासाठी गुगलनं आता हा नवा आणि युजर्ससाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्यासाठी गुगलने नवं धोरण जाहीर केलं आहे. गुगल सर्च रिझल्टमध्ये येत असलेली युजर्सची माहिती काढून टाकण्यासाठी, सोप्या भाषेत रिमूव्ह करण्यासाठी आता गुगलच थेट तुम्हाला मदत करेल. कुणाच्याही खासगी आणि व्यक्तिगत माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय़ घेण्यात आल्याचं कंपन्याकडून अधिकृतपणे सांगण्यात आलं आहे. गुगलचे ग्लोबल पॉलिसी हेड फॉर सर्च असलेल्या मिचेल चँग यांनी ही माहिती दिली आहे.
गुगल वरुन तुम्ही तुमची कोणकोणती माहिती रिमूव्ह करु शकता, याबाबतही माहिती देण्यात आली आहे. सर्चमधून तुम्ही तुमचा फोन नंबर, इमेल आयडी, राहण्याचा पत्ता किंवा तुमचे लॉग ईन डिटेल्स यासोबत तुम्ही स्वतः गुगलवर काय काय सर्च करता, या सगळ्याची माहिती रिमूव्ह करु शकणार आहात. पर्सनल कॉन्टॅक्ट इन्फोमध्ये जाऊन युजर्स गुगलच्या या नव्या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.
गेल्या काही काळात डिजिटल माध्यम विस्तारलंय. वेगान विस्तारलेल्या या माध्यमाचे जसे चांगले फायदे आहेत. तशेच काही जण या सगळ्याचा दुरुपयोग करुन गैरवापरही करताना पाहायला मिळालेत. अनेकांना त्यांची खासगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी गंभीर पावलं उचलण्याची गरज व्यक्त होत होतीच. त्यापार्श्वभूमीवर आता गुगलकडून उचलण्यात आलेलं हे पाऊल सगळ्याच युजर्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.
You can now request removal of personal contact information like a phone number, email address, or physical address, as well as login info, from Google Search. Learn more: https://t.co/ZTFRtWlNKz
— Google SearchLiaison (@searchliaison) April 27, 2022
दरम्यान, तुम्हाला जर तुमचा खासगी डेटा गुगलवरुन कायमचा काढून टाकायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला गुगलला रिकवेस्ट करावी लागेल. त्यानंतर गुगलकडून तुमचा डेटा काढून टाकण्यासाठी गुगल प्रक्रिया राबवले. त्यानंतर तुमचा डेटा पूर्णपणे गुगलवरुन रिमूव्ह केल्याचं तुम्हाला नोटीफिकेशनने सांगण्यातही येईल. अनेक गैरप्रकारांना यामुळे आळा बसेल, असा विश्वास गुगलकडून व्यक्त केला जातो आहे. युजर्ससाठी या नव्या फिचरचा वापर करणं, किती सुलभ आणि फायदेशीर ठरतं, हे देखील आता येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.