मुंबई : टिक टॉकला टक्कर देण्यासाठी गुगलने एक नवीन अॅप लाँच केला आहे. Tangi असं या अॅपचं (Google launch tangi app) नाव आहे. या अॅपवरही टिक टॉकप्रमाणे आपण व्हिडीओ पोस्ट करु शकतो. Tangi मध्ये 60 सेकंदाचा व्हिडीओ आपण पोस्ट करु (Google launch tangi app) शकतो.
कंपनीने अॅपचे नाव इंग्रजी शब्द टीच अँड गिव (TeAch aNd GIve) मधून घेतले आहे. डेवलपर्सने याला व्हिर्टिकल फॉर्मेटमध्ये तयार केले आहे. हा फॉर्मेट सध्या ट्रेण्डमध्ये आहे.
“कंपनीने आतापर्यंत अनेक व्हिडीओ तयार करणाऱ्यांसोबत काम केलं आहे. कंपनीचे उद्धीष्ठ एक क्रिएटिव्ह कम्यूनिटी तयार करणे आहे”, असं कंपनीने सांगितले.
हा अॅप एका नव्या ट्राय इट फीचरसह येत आहे. या ट्राय इट व्हर्जनवर लोक व्हिडीओ पाहून आपला व्हिडीओ बनवू शकतात. या प्लॅटफॉर्मवर आता क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी फोकस केले जात आहे. हा अॅप अॅपल स्टोअर आणि Tangi ची वेबसाईट (tangi.co) वर उपलब्ध आहे. आतापर्यंत याचा अँड्रॉईड अॅप आलेला नाही. कंपनीकडून अद्याप अॅपवर व्हिडीओ अपलोड करण्याची परवानगी दिली नाही.
Tangi अॅपवर यूजर्स व्हिडीओ बनवू शकतात. दुसऱ्यांचे व्हिडीओ लाईक करु शकतात. व्हिडीओवर कमेंटही करु शकतात. युजर्ससाठी एक सेक्शन असा तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये तारखेनुसार युजर्सने लाईक केलेल्या सर्व व्हिडीओंची लिस्ट मिळू शकते. हे फीचर युजर्सला खूप आवडू शकते. याचा एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. दरम्यान, या प्लॅटफॉर्मला 2016 ला बंद करण्यात आले होते.