मुंबई: सध्या तंत्रज्ञानाचं युग असून प्रत्येक गोष्टी एका क्लिकवर सहज उपलब्ध होत आहे. स्मार्टफोन आणि इतर गॅझेट्स वापरणाऱ्यांची संख्याही गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढली आहे. पण असं असताना गेल्या काही दिवसात सायबर क्राईमच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन गुगलने सेफर इंटरनेट डेच्या निमित्ताने नव्या सिक्योरिटी फीचर्सची घोषणा केली आहे. गुगल येणाऱ्या काही महिन्यात सुरक्षेवर आणखी लक्ष देणार आहे. या फीचर्सबाबत युजर्समध्ये कमालीची उत्सुकता आहे. सध्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही फीचर्स उपलब्ध आहेत. मात्र आणखी अपडेटच्या दृष्टीने गुगलने हे पाऊल उचललं आहे. वैक्तिगत माहिती आणि ऑनलाईन वापराबाबत सुरक्षितता असणं गरजेचं आहे. यासाठी गुगलने माहिती मागणाऱ्या आणि माहिती शेअर करणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी नव्या फीचर्सची घोषणा केली आहे. यामुळे अॅपल आयफोन युजर्स आणि गुगल क्रोम वापरणाऱ्या युजर्संना फायदा होणार आहे.
सेफ सर्च फिल्टरिंग पहिल्यापासून 18 वर्षांखालील युजर्संना बाय डिफॉल्ट मिळत आहे. आता लवकरच नवी सेटिंग एक्स्पिसिट इमाजरी ब्लर करेल. सेफसर्च फिल्टरिंग चालू नसेल तरीही रिझल्ट इमेज ब्लरच दिसेल.अॅपल आयफोन युजर्संना लवकरच गुगल अॅप प्रायव्हसीच्या प्रोटेक्शनसाठी फेस आयडी सेटअप मिळणार आहे. म्हणजेच आपला फोन कोणाकडे असल्यास तो ते खोलू शखणार नाही. यामुळे वैयक्तिक डेटापर्यंत पोहोचू शकणार नाही.
दुसरीकडे, गुगल तुमचा सेव्ह केलेला पासवर्ड भरण्यापूर्वी बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरण्यासाठी पर्याय जोडणार आहे. तुम्ही क्रोम आणि अँड्रॉईडमध्ये गुगल पासवर्ड मॅनेजरसोबत सेव्ह केलेले पासवर्ड सुरक्षितपणे दाखवण्यासाठी, कॉपी करण्यासाठी किंवा एडिट करण्यासाठी देखील या वैशिष्ट्याचा वापर करू शकता. यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी टाइप करण्याची गरज नाही. यासोबत गुगलने नवीन यूट्युब किड्स प्लेलिस्ट देखील लाँच केली. “Build a Safer Internet,” ज्यामध्ये कुटुंबांसाठी सुरक्षित, जबाबदार आणि सकारात्मक तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल जागरूकता वाढवणारे पर्याय असतील.
दुसरीकडे, गुगल आपल्या अँड्राईड युजर्संना सीक्रेट टॅब म्हणजेच इनकोगनिटो टॅब सुविधा देते. अनेकदा क्रोम ब्राउजरवर युजर्स काही बाबी आपल्या अकाउंटवरून सर्च करु इच्छित नाहीत.कारण यामुळे हिस्ट्रि क्लियर न केल्यास आपली माहिती उघड होते. अशात गुगल अँड्राईड युजर्स कोणत्याही सीक्रेट टॉपिकची माहिती घेण्यासाठी ब्लॅक विंडोची मदत घेतात.