गुगल पुढील आठवड्यात पहिल्यांदा एक मोठा कार्यक्रम आयोजित करीत आहे. ११ मे रोजी होणाऱया या कार्यक्रमाला Google io 2022 नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमात कंपनीतर्फे काही नवीन उत्पादनांबरोबरच (With new products) Android सॉफ्टवेअरची नवीन अपडेट सादर करण्यात येतील. परंतु, कंपनीने अद्याप कोणती उत्पादने कार्यक्रमात कव्हर करणार आहेत याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही, परंतु यावेळी कंपनी मोठ्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, यावेळी कंपनी Google Pixel 6A, Google Pixel Watch आणि Android 13 बाबत माहिती खुली करणार आहे. Android ची काही नवीन व्हर्जन समोर येऊ शकतील. यामध्ये अनेक लेटेस्ट आयकॉन्स (Latest Icons) दिसू शकतात. यावेळी नव्याने तयार करण्यात आलेला मीडिया प्लेबॅक पाहायला मिळेल. यामध्ये प्ले/पॉजची फ्लोटिंग स्वीच दिसतील. सेटिंग्जमध्ये डिस्प्ले साइज (Display size in settings) आणि टेक्स्ट वाढवण्याचा पर्याय असेल.
Pixel 6A ची स्पेसीफीकेशन्स
Google च्या या मोठ्या कार्यक्रमादरम्यान Pixel 6A Google Pixel 6A ची संभाव्य वैशिष्ट्ये देखील लॉंच केली जाऊ शकतात. या स्मार्टफोनमध्ये टेन्सर चिपसेट वापरला जाऊ शकतो, जो Pixel 6 आणि Pixel 6 Pro सारखा असेल. १२ मे रोजी हा स्मार्टफोन मार्केटमध्ये येईल. यात 6.2 इंच फुल एचडी प्लसचे रिझोल्यूशन मिळेल. या फोनच्या मागील पॅनलवर 12.2 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. एकूणच, मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा असेल आणि सेल्फीसाठी एकच कॅमेरा असेल.
Pixel Watch 2 ची संभाव्य वैशिष्ट्ये
पुढील आठवड्याच्या कार्यक्रमादरम्यान Google Pixel Watch देखील लॉंच करेल. वास्तविक, अलीकडेच एका स्मार्टवॉचला गुगल पिक्सेल वॉच असे नाव देण्यात आले आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की या आगामी घड्याळात हार्ट रेट मॉनिटरिंग आणि कॅलरी मोजणीचे ऑप्शन मिळेल. तसेच, या घड्याळासाठी सिलिकॉन बेल्ट देखील सादर केला जाईल. मात्र, त्याच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.