आयफोनची क्रेज अजूनही काही कमी झालेली नाही. तुम्ही पण जर आयफोनचे चाहते आहात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Flipkart वर Flipkart सेलवर केवळ 40 हजारात आयफोन 16 तुम्हाला घेता येऊ शकतो. ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्ट आणि एमॅझोनने आपला फेस्टीव्ह सेल्स सुरु केला आहे. यात तुम्हाला स्मार्टफोनसह अनेक गॅझेटवर मोठी ऑफर मिळणार आहेत.
जर तुम्ही नवीन आयफोन घेण्याच्या विचारात आहात तर ही वेळ चांगली आहे. फ्लिपकार्टवर आयफोन- 16 ची किंमत 69,999 रुपये आहे.जर तुम्ही आयफोन 14 एक्स्चेंज केला तर हा आयफोन-16 तुम्हाला 38,499 रुपयांना मिळणार आहे, जर तुम्ही OnePlus 12 ला एक्स्चेंज केले तर आयफोन-16 ची किंमत 41,399 होईल. Samsung Galaxy S 24 हा एक्सचेंज केल्यानंतर हा आयफोन-16 तुम्हाला 42,349 रुपयांना मिळू शकतो.
एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर तुम्हाला 1500 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. तसेच UPI ने पेमेंट केले तर एक हजार रुपयांची सूट मिळू शकते. Amazon वर देखील iPhone 16 ची किंमत 74,900 रुपये आहे. ही किंमत 79,900 च्या एमआरपी पेक्षा कमी आहे. Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड यूजर्सना पाच टक्के कॅशबॅक ऑफर मिळू शकते. फ्लिपकार्डवर एक्स्चेंज ऑफर तुम्हाला चांगली किंमत मिळणार आहे.
दोन्ही प्लॅटफॉर्मवर iPhone चे अन्य मॉडल्सवर देखील ऑफर आणि डिस्काऊंट मिळत आहे. Flipkart वर iPhone 15 ची किंमत 58,999 रुपये आहे. या आधी ही किंमत 69,900 रुपये होती. तर iPhone 16 Plus ची विक्री 79,999 रुपयात होत आहे. iPhone 16 हे सध्याचे iPhone चे सर्वात स्वस्त मॉडेल आहे. य़ात Apple ची नवीन तंत्रज्ञान AI च्या “Apple Intelligence” चा सपोर्ट आहे. यात Camera Control बटण देखील नवीन आहे. ते या कॅमेऱ्याला कंट्रोल करण्यासाठी मदत करते. Apple Intelligence फिचर iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये देखील उपलब्ध आहे. iPhone खरीदी करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.