नवी दिल्ली : मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप जगभरात लोकप्रिय आहे. मात्र, हे वापरताना थोडासा निष्काळीपणा देखील वापरकर्त्याला महागात पडू शकतो (Security tips to avoid WhatsApp hacking). फरीदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने अशाच एका प्रकरणाचा छडा लावला आहे. यात 100 हून अधिक मुलींचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक करण्यात आले. त्याचे चॅट मिळवून त्यांना ब्लॅकमेल करण्यात येत होते. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. या मुलींच्या फोन नंबरच्या मदतीने त्यांची व्यक्तिगत माहिती आणि चॅट हॅक करण्यात आले होते. यावरुनच त्यांना ब्लॅकमेल केले जात होते.
व्हॉट्सअॅपवरील चॅट एन्ड-टू-एन्ड एनक्रिप्टेड असते. म्हणजे मेसेज पाठवणारा आणि तो स्वीकारणारा या दोघांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही हे मेसेज वाचू शकत नाही. असं असलं तरी पाठवणारा किंवा मेसेज स्वीकार करणारा यातील एकाने चूक केली तरी त्या दोघांची चॅटिंग हॅक होऊ शकते. तसं होऊ नये म्हणून व्हॉट्सअॅपचे काही फिचर वापरणं आवश्यक आहे (Security tips to avoid WhatsApp hacking). त्यांचा उपयोग केल्यास व्हॉट्सअॅप अधिक सुरक्षित होते आणि चॅट हॅक होण्याचा धोकाही कमी होतो.
टच आयडी (Touch ID) किंवा Face ID चा उपयोग
अँड्रॉईड (Android) आणि आयओएस (iOS) दोन्हीवर वापरकर्ता व्हॉट्सअॅपला फिचरच्या मदतीने अधिक सुरक्षित करु शकतो. iPhone मध्ये फेस आयडी आणि अँड्रॉईड फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरच्या मदतीने अॅप अनलॉक करता येते. सेटिंगमध्ये जाऊन हे फिचर ऑन करु शकता.
टू स्टेप व्हेरिफिकेशन सेटिंग
व्हॉट्सअॅप अकाऊंट सुरक्षित करण्यासाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन अत्यंत उपयोगी आहे. याचा उपयोग केल्यास फोन रिसेट किंवा सिम बदलल्यास पुन्हा व्हॉट्सअॅप अकाऊंटचा उपयोग करण्यासाठी 6 अंकी कोडची गरज लागते. हा पासकोड केवळ नोंदणीकृत नंबरवर येतो. त्यामुळे इतर कुणालाही आपल्या व्हॉट्सअॅप अकाऊंटचा उपयोग करता येत नाही.
लास्ट सीन आणि प्रोफाईल फोटो हाईड करा
आपली प्रायव्हसी जपण्यासाठी प्रोफाईल फोटो आणि लास्ट सीन अनोळखी लोकांपासून हाईड करणे (लपवणे) आवश्यक आहे. त्यासाठी व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये जाऊन लास्ट सीन आणि प्रोफाईल फोटोची प्रायव्हसी बदलून केवळ आपल्या संपर्क क्रमांक यादीतील लोकांसाठी ते खुले ठेऊ शकता. जेणेकरुन अनोळखी व्यक्तींना आपली माहिती सहजासहजी मिळणार नाही.
व्हॉट्सअॅप अपडेट करत राहा
व्हॉट्सअॅपकडून नेहमीच अॅपमधील उणीवा (बग्ज) दूर करुन नव्या अपडेटसह अॅप लॉन्च केलं जातं. त्यामुळे ते वापरणं अधिक सुरक्षित असतं. म्हणूनच आपलं अॅप अपडेटेड ठेवणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्ले स्टोअरमधून ऑटोमेटिक अपडेट्स ऑन करता येईल. त्यामुळे अॅपचं नवं व्हर्जन आलं की ते स्वयंचलितपणे अपडेट होईल.
संशयास्पद लिंकवर क्लिक करु नका
व्हॉट्सअॅपवर अनेक प्रकारच्या लिंक येत राहतात. कधीकधी यातील चुकीच्या लिंकवर क्लिक झालं तर आपली संपूर्ण माहिती हॅक होण्याचा धोका असतो. त्यामुळे अनोळखी आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करणं टाळावं.
संबंधित बातम्या :
Cyber Attack Alert | ‘या’ ईमेल आयडीना बळी पडू नका, भारतावर मोठ्या सायबर हल्ल्याचा इशारा
Whatsapp Down | व्हॉट्सअॅपमध्ये तांत्रिक बिघाड, Last seen सह Privacy Settings मध्ये समस्या
लॉकडाऊनदरम्यान Whatsapp कडून युझर्ससाठी नवं फीचर लाँच
Security tips to avoid WhatsApp hacking