Google मोठ्या तयारीत आहे. कंपनीचा सर्च हा पर्याय, सेवा सध्या मोफत आहे. याच माध्यमातून कंपनीची मोठी कमाई होते. अर्थात कंपनी या पॉलिसीत, धोरणात मोठा बदल करण्याच्या विचारात आहे. कंपनी प्रीमियम फीचर्स सशुल्क करण्याच्या विचारात आहे. म्हणजे त्या सेवांसाठी तुम्हाला पैसा मोजावा लागेल. प्रीमियम फीचर्स म्हणजे जनरेटिव्ह AI च्या माध्यमातून येणारे निकाल, त्याआधारे युझर्सला फायदा घेता येईल, अशा सर्च पर्यायासाठी यापुढे पैसा मोजावा लागणार आहे. अर्थात याविषयीची अधिकृत भूमिका गुगलने अद्याप जाहीर केलेली नाही.
AI स्नॅपशॉच फीचर
गुगलने काही दिवसांपूर्वी गुगल सर्चसाठी जनरेटिव्ह AI स्नॅपशॉच फीचर एक्सपेरिमेंटल लाँच केले. या फीचरच्या मदतीने युझर्सला सर्च करण्यात आलेल्या विषयाविषयी AI सर्च माध्यमातून माहिती मिळते. एआय सर्च माध्यमातून ज्या विषयांचा धांडोळा घेण्यात आला. त्याची एक समरी युझर्सला पाहायला मिळते. अर्थात कंपनी त्यात बदल करु इच्छिते. Financial Times ने याविषयीचे एक वृत्त दिले आहे. गुगल जर बदल करत असेल तर कंपनी सर्च इंजिनसाठी पेमेंट वा शुल्क आकारण्याची शक्यता या वृत्तात नोंदवली आहे.
ChatGPT ने बिघडवला खेळ