पोळ्या लाटण्याची झंझट संपली! पीठ मळण्यापासून ते लाटून शेकण्यापर्यंत, सर्व काही एका ‘टच’वर

| Updated on: May 02, 2022 | 1:48 PM

एक अशी रोबोटिक मशीन तयार करण्यात आली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही काहीच मिनिटांमध्ये पोळ्या तयार करु शकतात. विशेष म्हणजे, यात पोळ्यांसाठी पीठ मळण्यापासून ते थेट पोळी शेकून तयार करण्यापर्यंत सर्व काही मशीनच्या माध्यमातून होत आहे. परंतु यासाठी तुम्हाला तशी किंमतदेखील मोजावी लागणार आहे.

पोळ्या लाटण्याची झंझट संपली! पीठ मळण्यापासून ते लाटून शेकण्यापर्यंत, सर्व काही एका ‘टच’वर
एका टचवर चपाती
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये (Indian food culture) पोळ्या हा महत्वाचा घटक आहे. भलेही त्या बनविण्याच्या पध्दती किंवा प्रकार वेगळे असले तरी, प्रत्येकाच्या जेवणात पोळी हा घटक असतोच असतो. त्यात जर कुटुंबातील सदस्य संख्या जास्त असेल तर, त्यानुसार गृहिणींना पोळ्यांची संख्यादेखील वाढवावी लागत असते. पोळ्यांसाठी पीठ मळून त्या लाटायला बरीच दमछाक होत असते. बर्याच महिलांना स्वयंपाकात पोळ्या तयार करणे हे अवघड काम (Hard work) वाटत असते. सुरुवातीला पीठ मळणे, पोळ्या लाटणे, त्यांना शेकणे हे अनेकांना अवघड जाते, शिवाय पोळ्या ह्या नीटनेटक्या गोल आकाराच्याच हव्यात, पोळी जास्त भाजलेली नको अशा विविध प्रकारची काळजीही घ्यावी लागत असते. पोळी वेडीवाकडी किंवा करपलेली असल्यास अनेकदा कुटुंबातील सदस्यांचे टोमणेही एकावे लागत असतात. परंतु आता महिलांना पोळ्या बनविणे अधिक सोपे होणार आहे. आता पोळ्या बनविणारी रोबोटीक मशीन (roti making machine) तयार करण्यात आली आहे. यात पीठ मळण्यापासून ते पोळी शेकण्यापर्यंत सर्वकाही या मशीनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. असे असले तरी या मशीनही किंमतही तशीच ठेवण्यात आली आहे.

पोळ्या बनविणार्या या मशीनचे नाव रोटीमॅटिक ठेवण्यात आले आहे. यातून हाताने बनवितात तशा गोल व गरमागरम पोळ्या तयार होतात. दरम्यान या मशीनची किंमत 5-10 हजार रुपये नसून तब्बल 1.11 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ही मशील सर्वसामान्यांचा खिसा हलका करणारी ठरत आहे. ही मशीन सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असली तरी क्वचितच लोक पोळ्या बनविणार्या मशीनवर इतका खर्च करतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

काय आहे खास?

ही मशीन ऑल इन वन अशा पध्दतीने काम करते. तुम्हाला मशीनमध्ये केवळ पीठ टाकावे लागणार आहे. त्यानंतर ही मशीन स्वत:च सर्व काम करणार आहे. पीठ मळणे, पोळ्या लाटणे, शेकणे आदी सर्व कामे ही एकच मशीन करते. विशेष म्हणजे ही मशील केवळ साध्या पोळ्याच नाही तर, मसाला पोळी, पुरी त्याच सोबत पिझ्झादेखील तयार करता येणार आहे.

सोशल मीडियावर कमेंटचा वर्षाव

या मशीनची माहिती समोर येताच सोशल मीडियावर यावर कमेंटचा अक्षरश: वर्षाव झाला आहे. मशीनची किंमत पाहून अनेक जण चकित झाले आहेत, तर अनेकांनी सांगितलेय, की मशीनसाठी इतकी किंमत मोजण्यापेक्षा आम्ही घरीच पोळ्या बनवू. तर दुसर्या एकाने म्हटले, की पत्नीशी घटस्फोट हवा असेल तर ही मशीन खरेदी करा.