मुंबई : संपूर्ण भारतात परवा (29 मार्च) होळीचा सण साजरा केला जाणार आहे. परंतु कोरोना साथीच्या रोगामुळे आपण आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना भेटू शकणार नाही, परंतु काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला असा एक मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही WhatsApp च्या मदतीने सर्व लोकांना होळीच्या डिजिटल शुभेच्छा (Digital Celebration) देऊ शकता. (Holi has to be made special, so send stickers to people on WhatsApp, know the complete process)
व्हॉट्सअॅपवरुन आपण आपल्या कुटूंबाला व्हिडीओ कॉल किंवा मेसेजद्वारे होळीच्या शुभेच्छा देऊ शकत असलो तरी आज आम्ही तुम्हाला स्टिकरच्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा कशा देता येतील ते सांगणार आहोत. यासाठी आपण मजेदार स्टिकर्स डाउनलोड करू शकता आणि WhatsApp वर लोकांना होळीच्या शुभेच्छा देऊ शकता. चला तर मग हे स्टीकर्स कसे डाउनलोड करायचे याची स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया…
– iPhone मध्ये स्टिकर्स पॅक डाऊनलोड करण्यासाठी WhatsApp ओपन करा आणि ज्या व्यक्तीला स्टिकर पाठवायचं आहे, त्या व्यक्तिची चॅट व्हिंडो ओपन करा
– टेक्स्ट बारवर क्लिक करुन उजव्या बाजूला स्टिकर टॅबवर क्लिक करा
– आता तुमच्या WhatsApp वरील सध्याचे स्टिकर ऑप्शन ओपन होतील.
– त्यानंतर तुमच्या आवडीचे स्टिकर्स डाऊनलोड करा.
– स्टिकर लायब्ररीमधील तुमचे आवडते स्टिकर्स सिलेक्ट करुन मित्रांना, नातेवाईकांना पाठवा
WhatsApp का Down होतं? कंपनीकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण, म्हणते ‘ती’ 45 मिनिटं आमच्यासाठी दिर्घकाळ#Whatsapp #WhatsAppDown #WhatsAppisdown #Instagram #facebookdown #Facebook https://t.co/jwqE5lBekf
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 20, 2021
संबंधित बातम्या
WhatsApp वर अॅमेझॉनकडून ऑफरचा मेसेज तर सावधान! वाचा काय आहे सत्य
आता ‘या’ Iphone मध्ये WhatsApp चालणार नाही? कंपनीकडून सेवा बंद
मोदी सरकारचा WhatsApp च्या New Privacy Policy ला विरोध, दिल्ली उच्च न्यायालयात ‘ही’ मागणी
(Holi has to be made special, so send stickers to people on WhatsApp, know the complete process)