मुंबई : चीनची स्मार्टफोन कंपनी ऑनरने भारतात आपला X-सीरीजचा नवा स्मार्टफोन Honor 9X लाँच (Honor 9x launch india) केला आहे. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 48 मेगापिक्सल सेंसरसह ट्रिपल कॅमेरा दिला आहे. त्यासोबतच पॉप-अप सेल्फी कॅमेराही दिला आहे. हा सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी (Honor 9x launch india) कॅमेरा आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत 13 हजार 999 रुपये आहे.
Honor 9X ची किंमत आणि ऑफर
हा स्मार्टफोन दोन व्हेरिअंट 4GB रॅम + 128GB स्टोअरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोअरेज व्हेरिअंटमध्ये येतो. 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोअरेजच्या व्हेरिअंटची किंमत 13 हजार 999 रुपये आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोअरेज व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये ठेवली आहे. 19 जानेवारी पासून हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. आयसीआयसीआय आणि कोटक महिंद्रा बँकच्या कार्ड धारकांना 10 टक्के सूट मिळणार आहे. सेलच्या पहिल्या दिवशी 4 जीबी व्हेरिअंटवर एक हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे.
Fall in love with the cutting edge dynamic X design of the new #HONOR9X #UpForXtra #AnXtraordinaryLaunch pic.twitter.com/rS3w5Yu20D
— Honor India (@HiHonorIndia) January 14, 2020
Honor 9X चे स्पेसिफिकेशन
यामध्ये 6.59 इंचाचा फुल व्ह्यू डिस्प्ले दिला आहे. कंपनीने फोनच्या डिझाईनवर काम केलेलं आहे. यामध्ये 3D कर्व बॅक पॅनल, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला आहे. स्मार्टफोन दोन रंगात सफायर ब्लू आणि मिडनाइट ब्लॅकमध्ये येतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर HiSilicon Kirin 710F प्रोसेसरही मिळतो.
ऑनरचा हा पहिला X-सीरीज स्मार्टफोन आहे ज्यामध्ये 48 MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल सेंसर मिळतो. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला आहे. मोबाईलमध्ये 4,000mAh बॅटरी क्षमता दिली आहे.