नवी दिल्ली | 21 March 2024 : दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने (Microsoft) त्यांच्या कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial intelligence) व्यवसायासाठी मुस्तफा सुलेमान यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. याविषयीची माहिती मुस्तफा सुलेमान यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन दिली आहे. त्यांची टीम मायक्रोसॉफ्टला AI प्रोडक्ट्स तयार करुन देईल. ही टीम Edge, Bing आणि Copilot सारख्या अनेक Microsoft AI प्रोडक्ट्सवर काम करत आहे. मुस्तफा सुलेमान हे सत्या नडेला यांच्या नेतृत्वात या प्रकल्पाला नवीन दिशा देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Google शी झाला वाद
मुस्तफा सुलेमान यांनी वर्ष 2010 मध्ये AI Lab Deep Mind नावाने कंपनीची सुरुवात केली होती. त्यानंतर 2014 मध्ये गुगलने ही कंपनी ताब्यात घेतली. Lab Deep Mind ही मायक्रोसॉफ्टच्या AI ला टक्कर देणारी एक मुख्य कंपन्यांपैकी एक आहे. भविष्यात या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. गुगलला भविष्यात आव्हान देण्यासाठी मायक्रोसॉफ्टने आघाडी उघडली आहे.
मायक्रोसॉफ्टमध्ये उमेदवारी
Lab Deep Mind चे गुगलने अधिग्रहण केले. पण सुलेमान यांना त्यांनी टीममध्ये घेतले नाही. गुगलसोबतच्या विवादातून सुलेमान यांनी 2022 ही कंपनी सोडली. त्यांनी सत्या नडेला यांच्या मायक्रोसॉफ्टमध्ये उमेदवारी केली. सुलेमान मायक्रोसॉफ्टमध्ये सहभागी झाल्यापासून कंपनीने इतर कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी दरवाजे सताड उघडे ठेवल्याचे बोलले जाते. या नवीन घडामोडींमुळे भविष्यात अजून काही जण या एआय टीममध्ये रुजू होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वडील चालवत होते टॅक्सी
मुस्तफा सुलेमान यांचा जन्म 1984 मध्ये इंग्लंडमध्ये झाला. त्यांचे वडील सीरियामध्ये टॅक्सी चालवत होते. तर आई युकेमध्ये नर्स होती. त्यांचे बालपण अत्यंत हालाकीचे आणि खडतर गेले. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण थॉर्नहिल प्राथमिक शाळेत पूर्ण केले. 19 व्या वर्षीच त्यांनी विद्यापीठाला रामराम ठोकला. 2010 मध्ये त्यांनी Demis Hassabis सह Deep Mind AI कंपनीची सुरुवात केली होती. त्यानंतर या कंपनीने या क्षेत्रात दबदबा निर्माण केला.