नवी दिल्ली | 30 डिसेंबर 2023 : सध्याच्या काळात अनेक जण ऑफलाईन सोबतच ऑनलाईन पण चांगली कमाई करत आहेत. ऑनलाईन कमाईत अनेकांचा ओढा युट्यूबकडेच असतो. सध्याच्या काळात असे अनेक युट्यूबर्स आहेत, जे जोरदार कमाई करत आहेत. त्यांच्या कमाईच्या आकड्यांनी डोळे पांढरे होतात. ग्रामीण भागातही अनेक जण या माध्यमातून पैसा कमावत आहेत. पण अनेकांना अजूनही व्ह्यूजचे गणित उमगेलेले नाही. दहा लाख व्ह्यूज झाल्यावर युट्यूब किती रुपये खात्यात जमा करते हे त्यांना माहिती नाही. तुमच्या मनात घोळणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर शोधुयात..
मॉनिटायझेशनचा निकष काय
सर्वात पहिल्यांदा मनात प्रश्न येतो की, युट्यूब कोणत्या आधारे युट्यूबर्सला रक्कम मोजते. म्हणजे त्याचे निकष तरी काय? तर युट्यूब एडसेन्सच्या माध्यमातून पेमेंट करते. जे कंटेंट क्रिएटर्स युट्यूबचा मॉनिटायझेशन क्रायटेरिया, निकष देण्यात आले आहे. त्यासाठी कंटेंट क्रिएटर्सला एडसेन्सचे खाते उघडावे लागते.
कसे करते पेमेंट Youtube
Youtube क्रिएटर्सला वेगवेगळ्या श्रेणीत विभागून त्यांच्या खात्यात रक्कम जमा करते. एक मिलियन म्हणजे दहा लाख व्यूज क्रिएटरला देण्यात येणारे पेमेंट सर्वाधिक असते. सर्वसाधारणपणे युट्यूब दहा लाख व्ह्यूजवर 100 डॉलर वा त्यापेक्षा अधिकचे पेमेंट करण्यात येते.